एक्स्प्लोर

Donald Trump : लवकर भारतासोबतचे संबंध चांगले करा, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टॅरिफमुळं अमेरिकेचे 19 खासदार भडकले, थेट लेटरबॉम्ब टाकला

Donald Trump Tariff: अमेरिकेच्या खासदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं भारतावर लादलेलं टॅरिफ मागं घेण्याची मागणी केलीय. ट्रम्प यांना त्याबाबत एक पत्र लिहिण्यात आलंय. 

न्यूयॉर्क: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलंय. याशिवाय अमेरिकेबाहेर निर्माण होणाऱ्या औषधांवर 100 टक्के टॅरिफ  ट्रम्प यांनी लागू केलंय. या निर्णयाचा फटका देखील भारतीय औषध कंपन्यांना बसणार आहे. अमेरिकेबाहेर तयार झालेल्या सिनेमावर देखील ट्रम्प यांनी 100 टक्के टॅरिफ लादलं आहे. ट्रम्प यांनी एचवन बी व्हिसाचं शुल्क 1 लाख डॉलर्स केलंय. भारतावर टॅरिफ लादणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे. अमेरिकेतली माजी एनएसए याशिवाय काही अधिकारी भारतासोबतचे संबंध बिघडवल्यानं ट्रम्प यांना जबाबदार धरत आहेत. अमेरिकेचे खासदार डेबोरा रॉस आणि रो खन्ना यांच्या नेतृत्त्वात 19 खासदारांनी ट्रम्प यांना पत्र लिहून भारतासोबतचे संबंध सुधारण्याचं आवाहन केलंय. याशिवाय खासदारांनी ट्रम्प प्रशासनानं भारतावर वाढवलेलं टॅरिफ देखील मागं घ्यावं अशी मागणी केलीय. 

'भारतासोबतचे संबंध चांगले करा'

अमेरिकेच्या या खासदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना 8 ऑक्टोबरला एक पत्र लिहिलं. अलीकडे वाढवलेल्या टॅरिफमुळं भारतीय वस्तूंवरील शुल्क 50 टक्के झालं आहे.यामुळं जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देश असलेल्या भारतासोबत संबंध तणावाचे झाले आहेत. संबंध तणावाचे होणं दोन्ही देशांसाठी नकारात्मक परिणाम समोर आले आहेत. सर्व 19 खासदारांनी राष्ट्रपती ट्रम्प यांना महत्त्वाची भागीदारी पुन्हा स्थापित करण्यासाठी आवाहन केलंय. 

'टॅरिफमुळं सप्लाय चेनला नुकसान'

खासदारांनी म्हटलं की ऑगस्ट 2025 च्या अखेरीस ट्रम्प प्रशासनानं भारतीय उत्पादनांवर टॅरिफ वाढवून 50 टक्के केलं आहे. ज्यामध्ये 25 टक्के रेसिप्रोकल टॅरिफ सह रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं 25 टक्के टॅरिफ लादलं आहे. यामुळं भारतीय निर्माते आणि अमेरिकन ग्राहक या दोघांचं नुकसान होत आहे. यामुळं सप्लाय चेनला नुकसान होत आहे. ज्यावर अमेरिकेच्या कंपन्या उत्पादनांना बाजारात आणण्यावर अवलंबून आहेत.  

'भारतावर अमेरिकन निर्माते अवलंबून'

अमेरिकेच्या खासदारांनी व्यापारी भागीदार म्हणून भारताचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. अमेरिकेचे निर्माते सेमीकंडक्टर पासून आरोग्य सेवा, ऊर्जा आणि मुख्य उत्पादनांसाठी भारतावर अवलंबून आहेत. भारतात गुंतवणूक करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांना जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. अमेरिकेत भारतीय भारतीय गुंतवणूकदारांनी स्थानिक समुदायांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या असं खासदारांनी म्हटलंय. 

ट्रम्प यांच्यामुळं भारत चीन आणि रशिया जवळ जाईल

अमेरिकेच्या खासदारांनी अमेरिकेनं टॅरिफ वाढवल्यानं भारतासोबतचं संबंध संकटात येऊ शकतात, असं म्हटलं.अमेरिकेतील कुटुंबांचा खर्च वाढू शकतो. अमेरिकेच्या कंपन्यांची जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता कमी होऊ शकते. ट्रम्प प्रशासनानं टॅरिफ लादल्यानं भारत रशिया आणि चीन जवळ येऊ शकतात अशी भीती खासदारांनी व्यक्त केली. अमेरिकेच्या खासदारांनी क्वाडचा देखील उल्लेख केला. 

महत्त्वाच्या बातम्या

गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget