New York Rain: अमेरिकेतील न्यूयॉर्क (New York) आणि पेन्सिलवेनिया (Pennsylvania) शहरांच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं आहे. बऱ्याच गाड्या सकल भागात साचलेल्या पाण्यात अडकल्या आहेत. गाडीतील लोकांना सुखरुप बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अमेरिकेत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.


मुसळधार पावसामुळे न्यूयॉर्कसह अमेरिकेतील सर्वच भागात पुराचा कहर पाहायला मिळत आहे. हायलँड फॉल्स, ऑरेंज काउंटी आणि न्यूयॉर्कमध्ये अतिवृष्टीमुळे अचानक पूर आला. न्यूयॉर्क शहराच्या उत्तरेला हडसन व्हॅली क्षेत्राचं प्रतिनिधीत्व करत असलेल्या माईक लॉलर यांनी ट्विटरवर मुसळधार पावसाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केले आहेत. मॅनहट्टनपासून 40 मैल लांब असलेल्या स्टोनी पॉईंट शहरात पुराचं पाणी दिसून येत आहे. स्टोनी पॉईंट शहरात आलेल्या पुरामुळे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.


त्याचबरोबर कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी पूरस्थिती लक्षात घेऊन रस्ते बंद केले आहेत. त्याच वेळी, लोकांना उच्च उंचीच्या भागात जाण्याचं आणि बोगद्याच्या मार्गाने न जाण्याचं आवाहन केलं आहे


पेन्सिलवेनिया शहरात पूरजन्य स्थिती


अमेरिकेतील (Ameria Rain) पेन्सिलवेनिया शहरात पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. एलन टाऊनपासून जवळपास 15 मैलावर असलेल्या दक्षिण-पुर्वेकडील क्वेकर टाऊनमधील रस्ते जलमय झाली आहेत. क्वेकर टाऊनलाही पुराचा वेढा आहे.


राष्ट्रीय हवामान विभागात काम करणारे हवामानशास्त्रज्ञ ब्रायन जॅक्सन म्हणाले की, कॅनडाच्या ओंटारियो प्रांतात थंडीच्या महिन्याप्रमाणेच हवामान राहण्याचा अंदाज आहे. थंडीसह हवामानात थोडी आद्रता देखील जाणवेल, असं हवामान विभागाने सांगितलं.


या दोन शहरांना पावसाने झोडपलं


मध्य पेन्सिलवेनिया आणि दक्षिण न्यूयॉर्क शहरात प्रचंड पाऊस (New York Flood) कोसळत आहे. तर, न्यूइंग्लंडच्या काही भागांमध्ये पुराचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानशास्त्रज्ञ ब्रायन जॅक्सन यांच्या म्हणण्यानुसार, बर्लिंगटन, वर्मोंट शहरांना पुढील दोन दिवस पुराचा धोका आहे. 


बचाव पथकाकडून लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्याचं काम सुरू


हवामान विभागाने सकल भागात राहणाऱ्या लोकांना उंचावरील क्षेत्रात जाण्याचं आवाहन केलं आहे. न्यूयॉर्क टाइम्सने आपत्कालीन व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून माहिती घेत म्हटलं आहे की, न्यूयॉर्कच्या ऑरेंज काउंटीमधील लोकांना बचाव पथक सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम करत आहे.


हेही वाचा:


New Delhi : दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे शाळा आज बंद; जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी