एक्स्प्लोर

America Cyclone Update : अमेरिकेत चक्रीवादळाचा हाहा:कार! 100 जणांचा बळी

America Cyclone Update : अमेरिकेमध्ये चक्रीवादळानं कहर केला आहे. या चक्रीवादळामुळे आतापर्यंत 100 जणांना जीव गमवावा लागला आहे.

America Cyclone Update : अमेरिकेला (America) चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. या चक्रीवादळामुळे आतापर्यंत 100 जणांना जीव गमवावा लागला आहे. चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा केंटकी भागाला बसला आहे. येथे अनेक इमारती कोसळल्या आहेत. हजारो लोक बेघर झाले आहेत. ताशी 320 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अमेरिकेतील 6 राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

अमेरिकेच्या केंटकी राज्यात चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मेफिल्डसह अनेक भागात चक्रीवादळामुळे सुमारे 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, मेफिल्ड परिसरातील मेणबत्ती कारखान्याला वादळामुळे मोठा फटका बसला आहे. मेणबत्ती कारखान्याला वादळाचा तडाखा बसला तेव्हा शेकडो कामगार कारखान्यात काम करत होते.

अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे चक्रीवादळ
चक्रीवादळामुळे अनेक इमारती कोसळल्या असून अनेक घरे उडाली आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अनेक भागात बचावकार्य सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हे वादळ अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे वादळ असल्याचे म्हटले आहे. गव्हर्नर अँडी बेशियर यांनी केंटकीमध्ये वादळाच्या पार्श्वभूमीवर आणीबाणी जाहीर केली आहे. 

केंटकीचे गव्हर्नर अँडी बेशियर यांनी हे चक्रीवादळ इतिहासातील सर्वात भीषण वादळ असल्याचे म्हटले असून राज्यात आणीबाणी जाहीर केली आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी ढिगाऱ्याखाली लोक अडकले असण्याची शक्यता असून मृतांचा आकडा 100 च्या वर जाण्‍याची भीती आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. केंटकीमधील 2 लाखांहून अधिक घरांमध्ये वीज गेली आहे. वादळात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

University of Chicago Crime News: बाथरुममध्ये तरुणीसोबत नको नको ते घडत होते, बाहेर मुलं माझा कधी नंबर येणार बोलत बसले; युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील हादरवणारी घटना
बाथरुममध्ये तरुणीसोबत नको नको ते घडत होते, बाहेर मुलं माझा कधी नंबर येणार बोलत बसले; युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील हादरवणारी घटना
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Embed widget