Russia Ukraine War : रशियाकडून हल्ला होण्याची शक्यता, युक्रेनमध्ये एअर अलर्ट जारी
Ukraine Russia War : युक्रेनमध्ये एअर अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारी रशियाच्या ताब्यातील क्रीमियामध्ये मोठा स्फोट झाला होता. यासाी युक्रेन जबाबदार असल्याचा आरोप रशियाने केला आहे.
Ukraine Russia War : युक्रेनमध्ये एअर अलर्ट (Air Alert) जारी करण्यात आला आहे. रशियाने रविवारी युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला (Missile Attack) केला. या दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाला तर काहीजण जखमी झाले. आता रशियाकडून पुन्हा हल्ल्याचा धोका पाहता युक्रेनमध्ये एअर अलर्ट जारी करण्यात आला आहे. रशियाने जेपोरिजियावर (Zaporizhzhia) क्षेपणास्त्राने हल्ला केला आहे. या क्षेपणास्त्र हल्ल्यात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान सोमवारी म्हणजे आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष (President of Russia) व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी सुरक्षा परिषदेसोबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेन सतर्क झालं आहे. पुतिन यांच्याकडून युक्रेनवर हल्ला होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे युक्रेनियन सरकारने हे पाऊल उचललं आहे.
रशियाचा युक्रेनवर हल्ला, क्षेपणास्त्र हल्ल्यात 17 ठार
सध्या रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. या दोन्ही देशातील तणावाला सुमारे सात महिने पूर्ण झाले असले, तरी यांच्यातील तणाव मिटण्याची चिन्हं दिसत नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार, रशियाने जेपोरिजियावर क्षेपणास्त्राने हल्ला केला आहे. या क्षेपणास्त्र हल्ल्यात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 40 युक्रेनियन नागरिक जखमी झाले आहेत. रशियाने जेपोरिजिया भागांत अनेक हल्ले केल्याचं सांगितलं जातं आहे. या हल्लांत मागील तीन दिवसांत 34 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.
क्रीमियामधील स्फोटामागे युक्रेनचा हात असल्याचा रशियाचा आरोप
शनिवारी रशियाच्या ताब्यातील क्रीमियामध्ये मोठा स्फोट झाला होता. यासाठी युक्रेन जबाबदार असल्याचा आरोप रशियाने केला आहे. रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रीमिया येथे पुलावर मोठा स्फोट झाला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी या स्फोटासाठी युक्रेनला जबाबदार धरत युक्रेनवर आरोप केले आहेत. शिवाय क्रीमियामधील स्फोट पाहता रशियाकडून युक्रेनवर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता आहे. रविवारीही रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र डागलं होतं.
लायमन शहरावर पुन्हा युक्रेनचा ताबा
काही दिवसांपूर्वी युक्रेनकडून रशियाला एक मोठा झटका देण्यात आला होता. युक्रेनमधील रशियाने ताबा मिळवलेल्या लायमन शहरावर पुन्हा एकदा युक्रेनियन सैन्यानं ताबा मिळवला होता. लायमन हे डोनेट्स्क प्रांतातील महत्त्वाचं शहरं आहे. लायमन हे युक्रेनमधील महत्त्वाचं शहर असून वाहतूकीचं केंद्रस्थान आहे. रशियाच्या नियंत्रणातून लायमन सहर परत घेणं हा युक्रेनचा मोठा विजय असून पुतिन यांना मोठा झटका असल्याचं म्हटलं जातं आहे. यानंतरच रशियाने युक्रेनवरील युक्रेनवरील हल्ले तीव्र केले आहेत.