एक्स्प्लोर

मोदींनी पाकिस्तानला सुनावलं, पण चीनच्या पोटात दुखलं!

बिजींग: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्रिक्स परिषदेत पाकिस्तानचे नाव न घेता वाभाडे काढत, पाकिस्तानला दहशतवाद्यांचा जन्मदाता देश असल्याचं संबोधलं. तसेच दहशतवादाविरोधातील लढ्यात ब्रिक्स राष्ट्रांनी एकत्रित होण्याचे आवाहन केलं होतं. या घटनेला 24 तासही उलटत नाही, तोच चीनने पाकिस्तानच्या बचाव केला आहे. चीनने पाकिस्तानचा बचाव करताना, कोणत्याही देशाला सरळसरळ धर्म किंवा दहशतवादाशी जोडणे चुकीचे असून चीन याच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. तसेच दहशतवादविरोधी लढ्यात पाकिस्तानच्या बलिदानाची जगाने दखल घेतली पाहिजे असं आवाहन केले आहे. गोव्यातील ब्रिक्स संमेलनात पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला दहशतवाद्यांचा जन्मदाता असल्याचं संबोधलं होतं. त्यावर चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी प्रतिक्रिया देताना, कोणत्याही देशाचा संबंध दहशतवादाशी जोडण्याच्या चीन विरोधात असल्याचं म्हटलं आहे. भारताने पाकिस्तानचं नाव न घेता केलेल्या टीकेसंदर्भात चुनयिंग यांना विचारले असता, ''दहशतवादविरोधी लढ्यात चीनची भूमिका स्पष्ट असून कोणत्याही देशाचा संबंध धर्माशी जोडणे चुकीचं आहे.'' ते पुढे म्हणाले की, ''आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात आहोत. तसेच याविरोधातील लढ्यात सर्वच देशांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे आम्हलाही मान्य आहे.'' मात्र दुसरीकडे पाकिस्तानचा बचाव करताना, चुनियंग यांनी पाकिस्तानने दहशतवाद विरोधातील लढ्यात दिलेल्या बलिदानाची दखल आंतरराष्ट्रीय जगताने घेतली पाहिजे, असे सांगितले. मोदींच्या टीकेवरुन पाकिस्तान भारतविरोधी कारवायांसाठी दहशतवादी संघटनांना अर्थिक रसदीसोबत शस्त्रास्त्रांचा पुरवठा करतो. यावर आंतरराष्ट्रीय जगताने कोणती पावले उचलवी, या प्रश्नावर चुनियांग यांनी तुमची चिंता समजू शकतो असं उत्तर दिलं. दहशतवाद विरोधातील लढ्यातील चीनची भूमिका स्पष्ट असल्याचा पुनरुच्चार करुन ते म्हणाले की, ''आम्ही दहशतवादाला कोणत्याही देशाशी किंवा धर्माशी जोडण्याच्या विरोधात आहोत. भारत आणि पाकिस्तान चीनचे शेजारी राष्ट्रे आहेत. या दोन्ही देशांनी चर्चोद्वारे आपपासतले मतभेद दूर करावेत, अशी आमची अपेक्षा आहे.'' संबंधित बातम्या BRICS संमेलनातही पंतप्रधान मोदींकडून पाकिस्तानचे वाभाडे ब्रिक्स संमेलनात पाचही राष्ट्रांचे प्रमुख मोदी जॅकेटमध्ये

महत्त्वाच्या बातम्या

Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
प्रत्येक नागरिकाला मिळणार 26000 रुपये, 'या' देशाचा महत्वपूर्ण निर्णय, आर्थिक वाढीचा थेट सामान्य लोकांना फायदा
प्रत्येक नागरिकाला मिळणार 26000 रुपये, 'या' देशाचा महत्वपूर्ण निर्णय, आर्थिक वाढीचा थेट सामान्य लोकांना फायदा
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Embed widget