Bomb Blast in Afghanistan : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये प्रशिक्षण केंद्र आणि शाळेवर हल्ला करण्यात आला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार शिया समुदायाला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 8 मुलांचा मृत्यू झाला आहे. काबूलमधील दश्त-ए-बरची भागात हा हल्ला झाला. अब्दुर रहीम शाहिद हायस्कूलवर तीन ते पाच आत्मघातकी हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यापैकी दोन बॉम्बचा स्फोट झाला आहे. हा स्फोट झाला तेव्हा अनेक विद्यार्थी वर्गात होते.


8 मुलांचा मृत्यू, पाच जण जखमी


काबूलच्या पश्चिमेला मुमताज ट्रेनिंग सेंटरजवळ हा स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या हल्ल्यात किमान पाच जण जखमी झाले आहेत. गृह मंत्रालयाने अब्दुर रहीम शाहिद हायस्कूलजवळ झालेल्या स्फोटाची पुष्टी केली, गृह मंत्रालयाने यावेळी सांगितले की, या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे, याचा तपशील नंतर सार्वजनिक केला जाईल. या स्फोटात आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना सांगितले. त्याचवेळी अब्दुल रहीम शाहिद हायस्कूलमध्ये स्फोट झाले आणि आमच्या शिया बांधवांना लक्ष्य करण्यात आले, असे काबूल पोलिसांचे म्हणणे आहे.


नुकसान आणि स्फोटाबाबत अधिक तपशील सार्वजनिक केला नाही


काबूल पोलिसांचे प्रवक्ते खालिद झद्रान यांनी तीन स्फोटांची पुष्टी केली, परंतु मालमत्तेचे नुकसान आणि स्फोटाबाबत अधिक तपशील सार्वजनिक केला नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


पाकिस्तानचा अफगाणिस्तानावर 'Air Strike', 47 जण ठार, मृतांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश


कोरोना निर्बंधांचं उल्लंघन करून बर्थ डे पार्टी; पोलिसांनी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना ठोठावला दंड


Coronavirus New Cases : दिलासादायक! नवीन रुग्णांमध्ये 43 टक्के घट, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1247 नवे रुग्ण


Amway Money Laundering : अ‍ॅमवेवर ईडीची मोठी कारवाई, 757 कोटींची मालमत्ता जप्त; जाणून घ्या प्रकरण


Amarnath : अमरनाथ यात्रेवर दहशतवादाचं सावट, टीआरएफ संघटनेची धमकी