एक्स्प्लोर

Kabul Blast: अफगाणिस्तानमधील मशिदीतील बॉम्बस्फोटात आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू, स्फोटाची जबाबदारी कुणाची?

Kabul Blast: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील मशिदीत केलेल्या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे तर 40 जण जखमी झाले आहेत.

Kabul Blast: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील मशिदीत केलेल्या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे तर 40 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काल खैर खाना परिसरातील मशिदीत लोक नमाज पठण करत असताना स्फोट झाला. काबूलमध्ये या स्फोटानंतर दहशतीचं वातावरण आहे. हा स्फोट मगरिबच्या नमाजाच्या वेळी झाला, ज्यामध्ये मशिदीचे इमाम अमीर मोहम्मद काबुली हे देखील ठार झाले. तालिबानचं सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर तालिबानचा प्रतिस्पर्धी आयएसने गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत. या हल्ल्यामागे त्याच दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय आहे. या स्फोटानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. 

स्फोटाची माहिती देताना काबूल सुरक्षा विभागाचे प्रवक्ते खालिद जद्रान यांनी सांगितले होते की, काबूलच्या पीडी 17 येथील मशिदीत बॉम्बस्फोट झाला. त्यांनी सांगितलं होतं की, सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून सर्व जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. या स्फोटात मशिदीचे मौलवी अमीर मोहम्मद काबुली यांचाही मृत्यू झाला असल्याचं त्यांनी काल सांगितलं होतं.

आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र गेल्या अनेक महिन्यांत असे अनेक हल्ले झाले आहेत, ज्यामध्ये मशिदींना लक्ष्य करण्यात आले. पण या हल्ल्यात एक नवीन गोष्टही समोर आली आहे. आतापर्यंत शिया मशिदींना आईएस या दहशतवादी संघटनेकडून लक्ष्य केले जात होते. पण आज ज्या भागात हा स्फोट झाला त्या भागात शिया लोकसंख्या नाही.

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानचे सरकार आहे. अलीकडेच तेथे तालिबान सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. अश्रफ घनी यांचे सरकार सत्तेवरून हटवल्यानंतर तालिबानने तेथे ताबा मिळवला. गेल्या काही महिन्यांत तालिबानमध्ये बॉम्बस्फोटाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यापूर्वी काबूलमधील एका मशिदीत स्फोट झाला होता, ज्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी अफगाणिस्तानातील गुरुद्वारांनाही लक्ष्य करण्यात आले होते.


इतर महत्वाच्या बातम्या

 

महत्त्वाच्या बातम्या

Israel Elections 2026: निवडणुकीच्या दिवशी इस्रायल रेल्वेसह मोफत प्रवास; मतपत्रिकांवर कशी पार पडते इस्रायलची निवडणूक? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
निवडणुकीच्या दिवशी इस्रायल रेल्वेसह मोफत प्रवास; मतपत्रिकांवर कशी पार पडते इस्रायलची निवडणूक? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Europe Protests : युरोपमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात लोकांचा भडका! लुटालूट, हिंसाचार अन् शेकडोंच्या अटकेने फ्रान्स, इटलीसह अनेक देशात हाहाकार
युरोपमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात लोकांचा भडका! लुटालूट, हिंसाचार अन् शेकडोंच्या अटकेने फ्रान्स, इटलीसह अनेक देशात हाहाकार
US Voter List Glitch : भारतातच नव्हे तर अमेरिकेच्या मतदार यादीतही घोळ, 30 हजार बिगर नागरिकांची नावे घुसडली
भारतातच नव्हे तर अमेरिकेच्या मतदार यादीतही घोळ, 30 हजार बिगर नागरिकांची नावे घुसडली
Donald Trump: अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget