एक्स्प्लोर
16 वर्षीय तरुणीवर 36 तासात 30 जणांकडून गँगरेप
साओ पाऊलो : ब्राझीलच्या साओ पाऊलोमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 16 वर्षांच्या तरुणीवर 30 हून जास्त नराधमांनी 36 तासांच्या कालावधीत बलात्कार केल्याचं वृत्त आहे.
बंदुकीच्या धाकाने 33 जणांनी हे दुष्कृत्य केल्याचं स्थानिक मीडियाने सांगितलं आहे. 20 मे च्या रात्री पीडित तरुणी तिच्या बॉयफ्रेण्डच्या घरी गेली. त्यानंतर तिच्या दुर्दैवाला सुरुवात झाल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर 4 ते 5 दिवसांनी काही जणांनी तिचे आक्षेपार्ह फोटो ट्विटरवर टाकले आणि ही घटना उघड झाली.
पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून तिचं काऊन्सिलिंग केलं जात आहे. गँगरेप प्रकरणी मुख्य संशयित असलेल्या तिच्या 20 वर्षीय बॉयफ्रेण्डसह चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ऑलिम्पिक पदक विजेत्या क्रीडापटूला ब्राझीलमधील रिओ दि जानेरोमध्ये लुटल्याची घटना ताजी असतानाच बलात्काराच्या धक्कादायक घटनेने ब्राझील हादरलं आहे. पुढील दोन महिन्यांच्या काळात रिओमध्येच ऑलिम्पिकचं आयोजन होत असल्याने वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement