एक्स्प्लोर

Mumbai BEST Election: एकाचवेळी बलाढ्य महायुती आणि ठाकरे बंधूंना मात देणारे शशांक राव कोण? बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर

Mumbai BEST Election Result 2025 : दी बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनेलने 14 जागांवर दणदणीत विजय मिळवत सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का दिला.

Mumbai BEST Election Result: मुंबईसह राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता असलेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा (BEST Election 2025) निकाल अखेर समोर आला आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधू यांचे उत्कर्ष पॅनेल आणि महायुतीचे सहकार समृद्धी पॅनेल यांच्यात कडवी लढत होईल, असा अंदाज होता. मात्र, सर्वांचा अंदाज चुकवत शशांक राव यांच्या पॅनेलने 14 जागांवर विजय (Mumbai BEST Election Result) मिळवत सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का दिला. तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलला एकूण सात जागांवर विजय मिळालाय.18 ऑगस्टला या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला. ही निवडणूक म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीच्यादृष्टीने लिटमस टेस्ट मानली जात होती. मात्र, एकाही जागेवर विजय न मिळवता आल्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या चिंता वाढल्या आहेत. तर दुसरीकडे भाजप आणि महायुतीकडून आता ठाकरे बंधुंवर सडकून टीका केली जात आहे.

मात्र या सगळ्यात शशांक राव यांच्या पॅनेलने 14 जागांवर दणदणीत विजय मिळवत सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे एकाचवेळी बलाढ्य महायुती आणि ठाकरे बंधूंना मात देणारे शशांक राव कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

कोण आहेत शशांक राव?  Who is Shashank Rao?

शशांक राव हे गेल्या अनेक वर्षांपासून कामगार संघटनांसोबत सक्रिय असून कामगारांच्या अनेक आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. तसा काम करण्याचा अनुभवही त्यांच्या पाठी आहे. आजवर अनेक आंदोलनं आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात त्यांनी वेळोवेळी घेतलेला पुढाकार हे त्यांच्या नेतृत्वाचं आणि आजचा विजयाचे फलित मानलं जातंय. शशांक राव हे मुंबई ऑटो रिक्षा युनियन आणि शहरातील बेस्ट वर्कर्स युनियनचे प्रमुख आहेत. शशांक राव हे कामगार संघटनेचे नेते शरद राव यांचे पुत्र आहेत. आठ वर्षांपूर्वी शशांक राव यांनी त्यांच्या पदार्पणातच मोठ्या ऑटो रिक्षा युनियनच्या संपाचे नेतृत्व करत ते यशस्वी केले होते. शरद राव यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या राव यांनी बेस्ट, बीएमसी, हॉकर्स, ऑटो आणि टॅक्सी ड्रायव्हर्स युनियनच्या कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या संपात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोकसभा निवडणुकीपूर्वी शशांक राव यांनी जनता दल युनाइटेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

 शशांक राव पॅनलचे विजयी उमेदवार - एकूण 14

1.  आंबेकर मिलिंद शामराव
2.  आंब्रे संजय तुकाराम
3.  जाधव प्रकाश प्रताप
4.  जाधव शिवाजी विठ्ठलराव
5.  अम्मुंडकर शशिकांत शांताराम
6.  खरमाटे शिवाजी विश्वनाथ
7.  भिसे उज्वल मधुकर
8.. धेंडे मधुसूदन विठ्ठल
9.  कोरे नितीन गजानन 
10.  किरात संदीप अशोक
 11. डोंगरे भाग्यश्री रतन (महिला राखीव) 
12.  धोंगडे प्रभाकर खंडू (अनुसूचित जाती/ जमाती)
13  चांगण किरण रावसाहेब ( भटक्या विमुक्त जाती)
14  शिंदे दत्तात्रय बाबुराव (इतर मागासवर्गीय)

प्रसाद लाड यांच्या पॅनेलचे विजयी उमेदवार - एकूण 7

1 रामचंद्र बागवे
2 संतोष बेंद्रे 
3 संतोष चतुर 
4 राजेंद्र गोरे 
5 विजयकुमार कानडे 
6 रोहित केणी (महिला राखीव मतदार संघ)
7 रोहिणी बाईत

आणखी वाचा

बेस्ट निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्ट, मध्यरात्री पुन्हा मतं मोजली अन् निकाल बदलला, नेमकं काय झालं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weakest Currency 2025 : डॉलरच्या तुलनेत सर्वात दुर्बल चलन कोणते? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
डॉलरच्या तुलनेत सर्वात दुर्बल चलन कोणते? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
बेळगावात अग्निवीरांचा शानदार दीक्षांत समारंभ; 31 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण
बेळगावात अग्निवीरांचा शानदार दीक्षांत समारंभ; 31 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं गाठला उच्चांक, सोनं 957 रुपयांनी महागलं, 24 कॅरेट, 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या 
चांदी 4034 रुपयांनी महागली, नवा उच्चांक गाठला, सोनं 957 रुपयांनी महागलं, सोन्याचा दर किती? जाणून घ्या
Nagarparishad Election EVM: नगरपरिषद निवडणुकीचं मतदान संपताच EVM मशीनचं सील तोडलं? गोंदियातील स्ट्राँग रुममध्ये नक्की काय घडलं?
मोठी बातमी: नगरपरिषद निवडणुकीचं मतदान संपताच EVM मशीनचं सील तोडलं? गोंदियातील स्ट्राँग रुममध्ये नक्की काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट
Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weakest Currency 2025 : डॉलरच्या तुलनेत सर्वात दुर्बल चलन कोणते? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
डॉलरच्या तुलनेत सर्वात दुर्बल चलन कोणते? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
बेळगावात अग्निवीरांचा शानदार दीक्षांत समारंभ; 31 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण
बेळगावात अग्निवीरांचा शानदार दीक्षांत समारंभ; 31 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं गाठला उच्चांक, सोनं 957 रुपयांनी महागलं, 24 कॅरेट, 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या 
चांदी 4034 रुपयांनी महागली, नवा उच्चांक गाठला, सोनं 957 रुपयांनी महागलं, सोन्याचा दर किती? जाणून घ्या
Nagarparishad Election EVM: नगरपरिषद निवडणुकीचं मतदान संपताच EVM मशीनचं सील तोडलं? गोंदियातील स्ट्राँग रुममध्ये नक्की काय घडलं?
मोठी बातमी: नगरपरिषद निवडणुकीचं मतदान संपताच EVM मशीनचं सील तोडलं? गोंदियातील स्ट्राँग रुममध्ये नक्की काय घडलं?
सांगलीत राडा; स्ट्र्राँग रुमबाहेर मोठ्या संख्येनं जमले लोकं; नगरपालिकेसाठी झालेल्या मतदानात 2900 मतांचा फरक
सांगलीत राडा; स्ट्र्राँग रुमबाहेर मोठ्या संख्येनं जमले लोकं; नगरपालिकेसाठी झालेल्या मतदानात 2900 मतांचा फरक
Nilesh Ghaywal: निलेश घायवळच्या अडचणी आणखी वाढणार? पोलिस रेड कॉर्नर नोटीस जारी करणार; लवकरच ताब्यात घेण्याची तयारी सुरू
निलेश घायवळच्या अडचणी आणखी वाढणार? पोलिस रेड कॉर्नर नोटीस जारी करणार; लवकरच ताब्यात घेण्याची तयारी सुरू
'मला वाटतं तू नक्की सिंगल आणि व्हर्जिन नाहीस' अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, विद्यापीठातील तीन प्राध्यापक निलंबित, व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
'मला वाटतं तू नक्की सिंगल आणि व्हर्जिन नाहीस' अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, विद्यापीठातील तीन प्राध्यापक निलंबित, व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
तिरुपती दर्शनाहून परतताना बारामतीमधील दाम्पत्याचा भीषण अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
तिरुपती दर्शनाहून परतताना बारामतीमधील दाम्पत्याचा भीषण अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
Embed widget