वाशिम : गेल्या काही महिन्यांमध्ये  राज्याच्या राजकारणामध्ये (Politics) मोठे बदल झालेले पाहायला मिळत आहेत. शिवसेना (Shivsena) फुटून एक गट भाजपसोबत (BJP) गेला आणि त्यांनंतर फडणवीस- शिंदे यांनी राज्यात सत्ता स्थापन केली. या घटनेला एक वर्ष ही उलटत नाही तोच राष्ट्रवादीचा एक मोठा फुटला भाजप आणि शिंदे गटासोबत गेला. असं जरी झालं असलं तरीही अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आजही महाविकास आघाडीचीच सत्ता असल्याचं पाहायला मिळत आहे. वाशिम (Washim) जिल्हा परिषदमध्येही काहीशी अशीच स्थिती आहे. महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांनी मिळून वाशिम जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवला होता. शिवसेनेचा एक मोठा गट फुटला तरी वाशिम जिल्हा परिषदेमधील एकही जिल्हा परिषद सदस्य शिंदे गटामध्ये गेला नाही. 

वाशिम जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेच्या एकूण सहा जागा निवडून आल्या होत्या, राष्ट्रावादीची देखील काहीशी अशीच परिस्थिती होती. पण सध्या राष्ट्रवादीचे वाशिम जिल्हा परिषदेतील चौदापैकी बारा सदस्य हे अजित पवार गटासोबत गेले आहेत. एकीकडे अजित पवार, शिंदे आणि फडणवीसांनी राज्यात सत्ता स्थापन केली आहे. पण तरीही वाशिम जिल्हा परिषदेवर सत्ता ही महाविकास आघाडीचीच आहे. त्यामुळे मतदारांपुढे नेमकं सत्ताधारी कोण असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. 

वाशिम जिल्हा परिषदेवर सत्तेसाठी खेळ?

विशेष बाब म्हणजे राजकारणात एकमेकांवर टीका करणारे आणि फोडाफोडीचं राजकारण करणारे राजकीय नेते हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्तेसाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेमकं विरोधक कोण, सत्ताधारी कोण असा संभ्रम सध्या वाशिम जिल्हा परिषदेमध्ये निर्माण झाला आहे. मतदारांसह कार्यकर्ते देखील गोंधळात पडल्याचं चित्र सध्या आहे. वाशिम जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे अव्वलस्थानी असलेले पक्ष आहेत. तर आगामी निवडणुकांमध्ये नेमकं कोणाला निवडून द्यायचं हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

वाशिम जिल्हा परिषदेमधील सद्यस्थिती 

पक्ष     सदस्य
राष्ट्रवादी  14
कॉंग्रेस   11
भाजप         07
 शिवसेना  06
जनविकास आघाडी (सध्या भाजपमध्ये) 06
वंचित         06
स्वाभिमानी     01
अपक्ष    01


त्यामुळे वाशिम जिल्हा परिषदेवर आता नेमकं कोण सत्ता स्थापन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  त्यामुळे आगामी निवडणुका या राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

हेही वाचा : 

Santosh Banger : @$%&X अशा कंडक्टरला मी पायाखाली तुडवेन, आमदार संजय बांगर भडकले; आगारप्रमुखांना कार्यालयात बोलावून सज्जड दम, काय आहे प्रकरण?