वाशिम: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांना (IAS Pooja Khedkar) यूपीएससीची नोटीस (UPSC) आल्यानंतर काही वेळातच वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांचे पीए धर्मराज चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली. ही भेट कार्यालयीन कामासाठी असून त्याची माहिती आपण देऊ शकत नसल्याची प्रतिक्रिया धर्मराज चव्हाण यांनी दिली. त्यामुळे यूपीएससीची नोटीस आणि त्यानंतर झालेली ही भेट यामध्ये खरंच काही योगायोग आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पूजा खेडकर या शिमधील शासकीय विश्रामगृहातील खोलीमध्ये बंद आहेत. गेल्या गेल्या तीन दिवसांपासून त्या खोलीत बंद असून कुणाशीही त्या संपर्क करत नाहीत. 


वादग्रस्त  IAS अधिकारी पूजा खेडकर सध्या वाशिमच्या शासकीय विश्रामगृहातील'गोदावरी' या खोलीत मुक्कामी आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकर यांना नोटीस बजावत आपण सादर केलेली दस्तावेज खोटी असल्याचा आरोप होत असून आपणांवर कारवाई का करण्यात येऊ नये अशा पद्धतीची नोटीस बजावली आहे. 


जिल्हाधिकाऱ्यांच्या पीएनी घेतली खेडकरांची भेट


यूपीएससीच्या नोटिसीनंतर काही वेळातच वाशिम जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक धर्मराज चव्हाण यांनी वाशिमच्या शासकीय विश्रामगृहावर पूजा खेडकरांची भेट घेतली. ही भेट कार्यालयीन कामासाठी असल्याचं ते सांगत असले तरी त्यांच्या भेटीमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र केंद्रीय लोकसेवा आयोगाने बजावलेल्या नोटीस संदर्भात तर ही भेट झाली नाही ना असा प्रश्न निर्माण होतोय. 


पूजा खेडकरांशी झालेल्या भेटीनंतर वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक धर्मराज चव्हाण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उत्तर देणे टाळलं.कार्यलयीन कामाची माहिती माध्यमाना देऊ शकत नाही अशी प्रतिक्रियात्यांनी दिली.


पूजा खेडकरांचे बनावट रेशन कार्ड एबीपी माझाच्या हाती


वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर कुटुंबीयांनी बनवलेलं बनावट रेशनकार्ड एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. याच रेशनकार्डच्या आधारे पूजा खेडकरांनी पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाकडे अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते आणि त्याच आधारे त्यांना डाव्या गुडघ्यात सात टक्के कायमस्वरूपी अपंगत्व असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं. 


पुढं याच प्रमाणपत्राच्या आधारे पूजाने केंद्रीय दिव्यांग विभागाकडून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवले होते. अशातच हे प्रमाणपत्र योग्य की अयोग्य असा प्रश्न उपस्थित झाला असताना खेडकर कुटुंबीयांनी बनवलेलं बनावट रेशन कार्ड एबीपी माझाच्या हाती लागेलेलं आहे. थर्मोव्हेरिटा कंपनीचा पत्ता देत, इथं खेडकर कुटुंबीय रहिवाशी असल्याचं या रेशनकार्डच्या माध्यमातून दाखवण्यात आलं होतं.


ही बातमी वाचा : 


IAS Pooja Khedkar : चमकोगिरी केली, चौकशी बसली ते प्रशिक्षणाला ब्रेक... एकाच आठवड्यात पूजा खेडकरांचं काय काय झालं?