वाशिम : गेल्या दहा दिवसांपासून विराजमान झालेल्या श्रीगणेशाला (Ganpati Bappa Morya) आज भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येत आहे. लाडक्या बाप्पाचे विसर्जन (Ganesh Visarjan 2024) करत 'पुढच्या वर्षी लवकर या' अशी आळवणी करण्यात येत आहे. दरवर्षी वाशिम (Washim) शहरातदेखील मोठ्या उत्साहात गणपती विसर्जन होत आहे. गणपती विसर्जन मिरवणूक सुरु होण्याआधी शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Group) विधानपरिषद आमदार भावना गवळी (Bhavana Gawali) पोलिसांवर (Police) चांगल्याच संतापल्याचे दिसून आले. 


आज वाशिम जिल्ह्यातील सार्वत्रिक गणेश मंडळाच विसर्जन होत आहे. दरवर्षी वाशिम शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक ही भावना गवळी यांच्या हस्ते मानाच्या बाप्पाची पूजा-आरती करून होते. त्याच चौकात वाशिम पोलिसांनी चौकी आहे. पोलीस चौकी समोर मंडप टाकण्यात आला आहे. मात्र, त्या मंडपात खुर्च्या नसल्याने आमदार भावना गवळी चांगल्याच संतापलेल्या पाहायला मिळाले. 


भावना गवळी पोलिसांवर संतापल्या


विसर्जन मिरवणुकीला काही वेळ होता. त्यामुळे आमदार भावना गवळी या काहीवेळ मंडपात बसण्यासाठी गेल्या होत्या. मंडपात खुर्च्या नसल्याने भावना गवळी संतापल्या. मंडप टाकता तर तुम्हाला खुर्च्या ठेवायला काय अडचण आहे? असा संतप्त सवाल यावेळी भावना गवळी यांनी पोलिसांना विचारला. दरम्यान, गणेशोत्सव विसर्जन (Ganpati Visarjan 2024) मिरवणुकीदरम्यान आमदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी ढोल वाजवला तर. यवतमाळ वाशिम लोकसभाचे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांनी ठेका धरल्याचे दिसून आले.  


भावना गवळेंनी लुटला ढोल वाजवण्याचा आनंद


दरम्यान, वाशिमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात (Chhatrapati Shivaji maharaj Chowk)  आज मानाचा असलेला गणपती शिवशंकर गणेशोत्सव मंडळाची माजी खासदार आणि विधान परिषदेच्या विद्यमान आमदार भावना गवळी यांच्यासह यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनीही मानाचे गणपतीचे पूजन केले. यानिमित्ताने विसर्जन मिरवणुकीत विधानपरिषदेचे आमदार भावना गवळी यांनी ढोल ताशे वाजवले तर दुसरीकडे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी ढोल ताशाच्या तालावर ठेका धरला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


VIDEO Bhavana Gawali : 'लाडकी बहीण' योजनेची मी पहिली लाभार्थी, मंत्रिपदही मिळून जाईल; समर्थकांच्या प्रश्नावर भावना गवळींचे उत्तर


Amit Thackeray : मनसेच्या बैठकीत सगळ्यांचं एकमत, 'राजपुत्र' निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याशिवाय पर्याय नाही? अमित ठाकरे कुठून लढणार?