मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) या निवडणुकीत 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. आता राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. 


मनसेचे मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे पक्षाचे नेते आणि सरचिटणीस यांची सोमवारी सकाळी बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीची तयारी, रणनीती, उमेदवारांची निवड आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. अमित ठाकरे यांनी यावेळी पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संसदीय राजकारणात असणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले.


अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?


याच बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा अमित ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यानंतर अमित ठाकरे यांच्या रुपात आणखी एक ठाकरे संसदीय राजकारणात दिसण्याची शक्यता आहे. अमित ठाकरे यांच्या घोषणेनंतर ते कोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार याबाबतच्या चर्चा आता रंगत आहेत. अमित ठाकरे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सक्रीय राजकारणात आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. आता अमित ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) नशीब अजमावणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर मुंबईतील तीन जागांची अमित ठाकरेंसाठी चाचपणी केली जात असल्याचे समजते. यामध्ये माहीम, भांडुप आणि मागाठणे या मतदारसंघांचा समावेश आहे. 


मनसेकडून तीन उमेदवारांची घोषणा 


काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा दौरा केला होता. या दौऱ्यात राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन उमेदवारांची घोषणा केली. मुंबईच्या शिवडीमधून पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar), पंढरपूर विधानसभेतून दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) तर लातूर ग्रामीणमधून राजू उंबरकर (Raju Umbarkar) यांच्या उमेदवारीची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Vidhansabha Election 2024: विधानसभेला भाजपसाठी 85 जागा महत्त्वाच्या, विनिंग मेरिटवर ए,बी,सी कॅटेगरीत विभागणी, 2019 मध्ये जिंकलेल्या काही जागा धोक्यात


एकीकडे राज ठाकरेंची भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका, दुसरीकडे पंढरपुरातील मनसेचे उमेदवार मुस्लीम मतदारांना घेऊन निघाले अजमेर शरीफला