एक्स्प्लोर

Wardha Crime : घरफोड्या करणारा अट्टल चोर अखेर जेरबंद, 3 लाख 84 हजारांचा मुद्देमाल जप्त

घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. वर्ध्यातील स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. द

Wardha Crime : विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. वर्ध्यातील स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. दरम्यान, या आरोपीकडून वितळवलेल्या दागिन्यांसह 3 लाख 84 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सततच्या घरफोड्या होत असल्यानं परिसरातील नागरिक दहशतीत होते. अखेर हा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या आरोपीकडून घरफोडीचे 6 गुन्हे उघडकीस आले आहेत.

विशेष म्हणजे नागपूर आणि वर्धा शहरात अगदी नीटनेटका राहणारा हा व्यक्ती चोर असेल याची कोणाला शंकाही आली नव्हती. मात्र, नीटनेटके कपडे घालून बसने प्रवास करुन दिवसा घरांची पाहणी करायची आणि रात्री टार्गेट केलेल्या घरांच्या घरफोड्या करायच्या हा त्याचा व्यवसाय होता. प्रविण विनायक आक्केवार (54) (रा. चंद्रपुर ) असं या आरोपीचं नाव आहे. रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोड्या तसेच महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळविल्याच्या अनेक घटना घडत असल्यामुळं परिसरातील नागरिक मोठ्या दहशतीत होते. लवकरात लवकर या आरोपींना पोलिसांनी अटक करावी अशी मागणी करत होते. पोलिसांनी दिवसा आणि रात्रीही परिसरात पेट्रोलिंग वाढवली आहे. या चोरट्याला अटक झाल्याची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी दिलासा व्यक्त केला आहे. तर पोलिसांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे. 

Wardha Crime : घरफोड्या करणारा अट्टल चोर अखेर जेरबंद, 3 लाख 84 हजारांचा मुद्देमाल जप्त

बळवंत मारोतीराम कोहाड (रा. साईनगर वर्धा) हे बाहेर गावी गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घराच्या आत प्रवेश केला. अंदाजे 10 हजार रुपये चोरुन नेले होते. ज्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तसेच रामनगर आणि वर्धा शहर परिसरात रात्रीचे घरफोडीचे प्रमाण वाढल्यानं स्थानीक गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी आरोपीच्या शोधात पेट्रोलींग वाढवली होती. स्थानीक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अमोल लगड हे पथकासह चोरी व घरफोडीचे गुन्हे वारवांर होत असलेल्या भागात पेट्रोलींग करीत असताना त्यांना एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना दिसला होता. 

वितळवलेल्या दागिन्यांसह रोख रक्कम सापडली 

पेट्रोलींग पथकातील कर्मचारी चंद्रकांत बुरंगे यांनी संशयिताला लगेच ओळखून तो घरफोडीचा अट्टल गुन्हेगार प्रविण विनायक आक्केवार असल्याचे सांगितल्याने संशयिताची  सखोल विचारपूस केली. त्याच्याजवळील साहित्याची पाहणी केली. तेव्हा घरफोडी करण्याकरता वापरण्यात येणारे लोखंडी टामी, लोखंडी छन्नी, पोर्टेबल ईलेक्ट्रानीक वजन काटा, चोरी केलेल्या दागिण्यांना वितळवून तयार केलेले सोन्या चांदीचे तुकडे तसेच नगदी रोख मिळून आले. त्यानंतर पोलीसांनी त्याची सखोल चौकशी केली. आरोपी हा मागील काही महिन्यांपासून केशव सिटी, साईनगर, पिपरी मेघे अशा परिसरात रात्री फिरुन बंद घराची पाहणी करुन चोरी करत असल्याचे आरोपीनं कबुल केले. तसेच हिंगणघाट शहरात सुध्दा चोरी केल्याचं त्यानं कबुल केलं.

आरोपीकडून 3 लाख 84 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त 

आरोपीच्या ताब्यातून 3 सोन्याचे तुकडे, चांदीचे तुकडे आणि नगदी 8 हजार रुपये. यासोबतच इतर साहीत्य असा एकुण 3 लाख 84 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीने पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत 4 घरी तसेच पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत 2 ठिकाणी घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीस अटक करुन पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन रामनगर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News: शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News: शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Embed widget