Wardha News Update : वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात धरकुलासाठी शोले स्टाईनले आंदोलन करण्यात आले आहे. आर्वी तालुक्यातील राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे दिलीप पोटफोडे यांनी पंतप्रधान आवास योजनेची थक बाकी लवकर मिळावी या मागणीसाठी 'शोले स्टाईल'  आंदोलन केले आहे. यासाठी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे.

Continues below advertisement


2019 नंतर आर्वी शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या 2133 लाभार्थ्यांना केंद्र सरकारचे अनुदान मिळाले नाही. यासाठी सातत्याने राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाने निवेदन, आंदोलन आणि मोर्चाद्वारे थकीत अनुदान मिळावे यासाठी मागणी केली. परंतु, अद्याप ही नागरिकांना अनुदान मिळाले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर चढल्याने प्रशासनाची काही काळ तारांबळ उडाली. परंतु, काही वेळाने हे कार्यकर्ते टाकीवरून खाली आले. 


राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सध्या हे आंदोलन मागे घेतले असले तरी येत्या सोमवारी म्हणजेच 23 ऑगस्टपर्यंत शहरातील सर्व थकित लाभार्थ्यांच्या अनुदानाचा विषय निकाली निघाला नाही तर नाईलाजाने कोणतीही सूचना न देता आर्वी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नगरपरिषद कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा दहन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी दिला असून याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकारची राहील असे पोटफोडे यांनी म्हटले आहे.  


पाण्याच्या टाकीवर फोडली महागाईची हंडी
तरुण पिढीला उध्वस्त करणार्‍या चुकीच्या शैक्षणिक धोरणांची, अन्नधान्यावर लावलेल्या जीव घेणाऱ्या जीएसटी करप्रणालीची आणि घरकूल योजनेतील थकीत लाभार्त्यांसाठी पाण्याच्या टाकीवर चढून कार्यकर्त्यांनी हंडी फोडली.  


नागरिकांतून संताप


आर्वी तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेच्या अनेक लार्भार्थ्यांची अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. थकीत रक्कम मिळावी यासाठी नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी केली. परंतु, त्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही. त्यामुले संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलाचे हत्यार उपसले. अनुदानाची रक्कम दिल्याशिवाय पाण्याच्या टाकीवरून उतरणार नाही, अशा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता. परंतु, अधिकाऱ्यांनी अनुदान जमा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु, प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.   


महत्वाच्या बातम्या


Wardha crime : वर्धा हादरलं, पत्नीने केली पतीची निर्घून हत्या, हात-पाय तोडून जाळले 


Aaditya Thackeray : आज आनंदाचा दिवस, मला पोरकट राजकारणात जायचं नाही, जांबोरी मैदानावरुन आदित्य ठाकरेंचं वक्तव्य