Aaditya Thackeray : सगळीकडे दही हंडीचा (Dahi Handi) उत्साह चांगला आहे. मी अनेक ठिकाणी फिरणार आहे. या दही हंडी महोत्सवाची एक वेगळीच मजा असल्याचे मत शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी व्यक्त केले. वरळीतील जांबोरी मैदानाच्या (Jambori Maidan) बाबातीत देखील आदित्य ठाकरेंना यावेळी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितलं की, मला या पोरकट राजकारणात जायचं नाही. दही हंडीसाठी जांबोरी मैदान मिळावं यासाठी आम्ही अॅप्लायच केले नव्हते. आज आनंदाचा दिवस आहे. सर्वांनी तो उत्साहत साजरा करावा असेही ठाकरे म्हणाले.
प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नका
दोन वर्षापूर्वीच अडीच कोटी रुपये खर्चून आम्ही जांबोरी मैदान चांगले केले आहे. माझी सर्वांना एवढीच विनंती आहे की, प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नका. हा बालिशपणा असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मागील दोन वर्ष कोरोनाच्या संकटात गेली. त्यामुळं आपल्याला हा उत्सव साजरा करता आला नव्हता. पण यावर्षी मात्र, जल्लोषात दही हंडीचा उत्सव साजरा केला जात असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मी अनेक ठिकाणी जात आहे. प्रतिसाद चांगला मिळत आहेत. दही हंडी उत्साहात साजरी केली जात आहेत. पोरकट राजकारणात जायचं नाही.
भाजपने (bjp) वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. त्यामुळं ही शिवसेनेवर मात असल्याचे बोलले जात होते. वरळीत शिवसेनेचे (shivsena) तीन आमदार आणि एक खासदार असूनही शिवसेनेला वरळीचं जांबोरी मैदान मिळवता आलं नाही. त्यातही शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात भाजपने घुसखोरी केल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. पण यावर आज आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही दही हंडीसाठी जांबोरी मैदान मिळावं यासाठी आम्ही अॅप्लायच केले नव्हते, असे ठाकरे म्हणाले. मला या पोरकट राजकारणात जायचं नाही. आजचा आनंदाचा दिवस असल्याचे ते म्हणाले.
देशभरात गोपाळकालाचा उत्साह
देशभरात गोपाळकालाचा (Gopalkala) उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दहीहंडीचं (Dahihandi) वेगळं आकर्षण आहे. राज्यात दहीहंडीची विशेष उत्साह दिसत आहे. मुंबई, ठाण्यासह पुण्यात दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. विविध मंडळांकडून दहीहंडी उत्सवात लाखोंच्या बक्षीस देण्यात येतात. गोविंदा पथकं अनेक महिने मानवी मनोरे लावण्यासाठी सराव करत असतात. कोरोना संकटामुळं यंदा तब्बल दोन वर्षांनी दहीहंडी साजरी होणार आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातील गोविंदा पथकं मनोरे रचायला सज्ज झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सुरक्षेची सर्वोतोपरी काळजी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Shiv Samvad Yatra : गद्दारांनी माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला, याचं मला दुःख : आदित्य ठाकरे
- Gokulashtami 2022 : महाराष्ट्रात 'अशी' साजरी केली जाते दहीहंडी; जाणून घ्या परंपरा