एक्स्प्लोर

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी परिपूर्ण मतदारयादी वापरा, ठाकरे गटाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी परिपूर्ण मतदारयादी वापरण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Local body elections : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी परिपूर्ण मतदारयादी वापरण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 ची केंद्रीय निवडणूक आयोगाची विधानसभा निवडणुकांसाठीची मतदार यादी आधारभूत धरून त्याप्रमाणे निवडणुका आयोजित करण्याचे घोषित केले आहे. 

कायदेशीररित्या परिपूर्ण नसलेली यादी वापरण्यास ठाकरे गटाचा विरोध

विधानसभा निवडणूक 2024 नंतर 1 जुलै 2025 या कालावधीत राज्यातील वाढलेल्या मतदार यादीबाबत कुठलेही आक्षेप अथवा सूचना राजकीय पक्षांकडून तसेच नागरिकांकडून केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे मागवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कायदेशीररित्या परिपूर्ण नसलेली ही मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत वापरण्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार, शिवसेना नेते आणि सचिव श्री अनिल देसाई यांनी तीव्र विरोध दर्शवून सदर यादीच्या शुद्धीकरणाबाबत राजकीय पक्षांना प्रारूप छापील मतदार यादी उपलब्ध करून तसेच नागरिकांसाठी वर्तमानपत्र, सोशल मीडिया तसेच दूरचित्रवाणी इत्यादींवर जाहिरात करून त्याद्वारे सूचना व आक्षेप मागवून मतदार यादी परिपूर्ण केल्यानंतरच ही मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत करण्यात यावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष मा. राज्य निवडणूक आयुक्त श्री दिनेश वाघमारे यांना भेटून करण्यात आली. 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये ईव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅटचा वापर करणेबाबतही चर्चा

एक जुलै 2025 या आधारभूत तारखेनंतर वाढलेल्या मतदारांना मतदान प्रक्रियेत समाविष्ट करणेबाबत व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये ईव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅटचा वापर करणेबाबतही चर्चा या बैठकीत करण्यात आली. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या सर्व आक्षेपांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन या शिष्टमंडळास दिले.सदर बैठकीस राज्य निवडणूक आयोगाचे अतिरिक्त आयुक्त श्री सुरेश काकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपसचिव श्री प्रवीण महाले, उपसचिव श्री सचिन परसनाईक व श्री दिनेश बोभाटे उपस्थित होते. मतदार यादी परिपूर्ण केल्यानंतरच ही मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत करण्यात यावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष मा. राज्य निवडणूक आयुक्त श्री दिनेश वाघमारे यांच्याकडे करण्यात आली. 

महत्वाच्या बातम्या:

Bachchu Kadu: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत व्हीव्हीपॅट नको, तर मग निवडणूक कशाला हव्यात? भाजप कार्यालयातच शिक्का मारा; बच्चू कडूंचा 'प्रहार'

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
Embed widget