एक्स्प्लोर

Ujjwal Nikam : एक नागरिक म्हणून अतिशय दुःख, निकालाचे मूल्यमापन करून सर्वोच्च न्यायालयात अपील करावी; मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालावर ॲड. उज्वल निकमांची प्रतिक्रिया

Ujjwal Nikam : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालाचे एक नागरिक म्हणून मला अतिशय दुःख आहे. निकालाचे मूल्यमापन करून सर्वोच्च न्यायालयात अपील करावी अशी प्रतिक्रिया ॲड. उज्वल निकम यांनी दिलीय.

Ujjwal Nikam on Mumbai Train Blast Case मुंबई : मुंबईत 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने आज (21 जुलै) महत्त्वाचा निकाल दिला. त्यानुसार मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील (Mumba Blast Case) 11 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात 189 जणांचा मृत्यू झाला होता. तर 827 जण जखमी झाले होते. मात्र, उच्च न्यायालयाने याप्रकरणातील सर्व 11 आरोपींना निर्दोष सोडल्याने तपास यंत्रणांना मोठा झटका बसला आहे. दरम्यान, या प्रकरणातील निकालावर सरकारी वकील उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली असून एक नागरिक म्हणून या निकालामुळे अतिशय दुःख झाल्याचे ते म्हणाले आहे.

निकालाचे मूल्यमापन करून सर्वोच्च न्यायालयात अपील करावी - उज्वल निकम

मुंबईत ज्याप्रमाणे 1993 साली साखळी बॉम्बस्फोट करण्यात आला तशाच पद्धतीने आरडीएक्स वापरून 2006 साली बॉम्ब स्फोट घडवण्यात आला. त्याचा परिणाम असा झाला यात 200 ते 250 निष्पाप लोक मृत्युमुखी पडले. तर अनेक लोक गंभीर रित्या जखमी झाले. अर्थात हा खटला जरी मी चालवला नसला, तसेच या खटल्याबाबत वस्तुस्थिती माहिती नसली तरी प्रथमदर्शनी ही बाब स्पष्ट होते की, सत्र न्यायालयाने दिलेला निकाल हा मुख्य न्यायालयाने फिरवला. याचाच अर्थ असा की, मुंबईच्या उच्च न्यायालयाने ज्या पुराव्यावर शिक्षा दिली होती तो अग्राह्य मनाला आणि यातील आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली.

एक नागरिक म्हणून मला जेवढं दुःख तेवढं प्रत्येकाला असेल यात शंका नाही- उज्वल निकम

माझ्या माहितीप्रमाणे यातील काही आरोपींना जन्मठेप आणि फाशीची देखील शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र आता हे सगळेच आरोपी निर्दोष म्हणून सुटल्याने एक नागरिक म्हणून नक्कीच मला जेवढं दुःख आहे तेवढं प्रत्येकालाच दुःख असेल यात शंका नाही. असेही ते म्हणाले. मात्र आता सरकारने या खटल्याची पुन्हा चाचपणी करून सर्वोच्च न्यायालयात अपील करावी लागेल. जर या खटल्यावर कोर्टाने स्टे दिला असता तर बाब वेगळी असती. मात्र आता तत्काळ सरकारला सर्वोच्च न्यायालयात अपील करावी लागेल. तसेच या निकालाचे मूल्यमापन देखील करावे लागेल असेही सरकारी वकील उज्वल निकम म्हणाले.

2006 चे मुंबई बाँबस्फोट प्रकरणातील आतापर्यंतचे अपडेट्स

1.  जुलै 2006 रोजी सात लोकल ट्रेनमध्ये बाँबस्फोट

2. बाँबस्फोटात 209 जणांचा मृत्यू, 800 हून अधिक जखमी

3. बाँब असलेले प्रेशर कुकर लोकल ट्रेनमध्ये ठेवून स्फोट

4. खार रोड-सांताक्रूझमधल्या स्फोटात 7 तर,बांद्रा-खार रोडच्या स्फोटात 22 ठार

5. जोगेश्वरीच्या स्फोटात 28,माहिम जंक्शनला 43,मीरा रोड-भायंदरमध्ये 31 ठार

6. माटुंगा रोड-माहिम दरम्यानच्या स्फोटात 28 आणि बोरिवलीमध्ये झाले स्फोट

7.इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी घडवले होते बाँबस्फोट

8. मकोका कोर्टाकडून सप्टेंबर २०१५ ला १२ जण दोषी, ५ आरोपींना फाशी, ७ आरोपींना जन्मठेप

9. फैजल शेख,असिफ खान, कमाल अन्सारी,एहतेशाम सिद्दीकी,नाविद खान यांना फाशीची शिक्षा

10. मकोका कोर्टानं सुनावलेल्या फाशीच्या मंजुरीसाठी सरकारची उच्च न्यायालयात याचिका

11. 21 जुलै रोजी मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील 11 आरोपींची निर्दोष सुटका 

हे हि वाचा

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
Shivdeep Lande: आई ती आईच... शिवदीप लांडेंच्या मातोश्री म्हणाल्या पोरानं IPS नोकरी राजीनामा नव्हता द्यायला पाहिजे
Shivdeep Lande: आई ती आईच... शिवदीप लांडेंच्या मातोश्री म्हणाल्या पोरानं IPS नोकरी राजीनामा नव्हता द्यायला पाहिजे
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Solapur : सोलापूर महापालिकेतील राजकीय गणित बदलणार? कोण बाजी मारणार?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar पालिकेत कोणाची बाजी? अनधिकृत बांधकामामुळे पालिका चर्चेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
Shivdeep Lande: आई ती आईच... शिवदीप लांडेंच्या मातोश्री म्हणाल्या पोरानं IPS नोकरी राजीनामा नव्हता द्यायला पाहिजे
Shivdeep Lande: आई ती आईच... शिवदीप लांडेंच्या मातोश्री म्हणाल्या पोरानं IPS नोकरी राजीनामा नव्हता द्यायला पाहिजे
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
Bihar Election Result 2025: बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
Embed widget