एक्स्प्लोर

मध्यावधीचा पैसा शेतकऱ्यांना द्या: उद्धव ठाकरे

बुलडाणा: मध्यावधी निवडणुकीसाठी तयार असल्याचं म्हणत असाल, तर जो पैसा निवडणुकीसाठी आहे, तो पैसा शेतकऱ्यांना द्या, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.  ते शेगावमध्ये बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच मध्यावधी निवडणुकीसाठी तयार असल्याचं म्हटलं होतं. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "कर्जमुक्तीच्या विषयाला फाटा देण्यासाठी मध्यावधीचा विषय काढला जात आहे. मध्यावधीला तुम्ही तयार आहात म्हणजे तुमच्याकडे बक्कळ पैसा आहे. हाच पैसा तुम्ही शेतकऱ्यांना द्या. मध्यावधीची गरज लागणार नाही, आम्ही पाठिंबा देऊ." सरकारने कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी न केल्यास आम्ही राजकीय भूकंप घडवू, असा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केला. "मी शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. सत्तेची पर्वा न करता शेतकऱ्यांना  पाठिंबा दिला. सरसकट शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा ही शिवसेनेची मागणी कायम आहे", असं ठाकरेंनी नमूद केलं. "कर्जमुक्तीची घोषणा करणाऱ्या सरकारला त्याची अंमलबजावणी करण्याची सुबुद्धी आणि ताकद द्या अशी प्रार्थना शेगावच्या गजानन महाराजांकडे केली आहे" असं उद्धव ठाकरे म्हणाले. "देशभरातील  शेतकरी पेटून उठतो आहे. या क्रांतीची सुरुवात माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केली, याचा आनंद. या गोष्टीचा आनंद की सरकारने आंदोलन पेटण्याआधीच कर्जमुक्तीचा निर्णय घेतला. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे", असा विश्वास त्यांनी दिला. आता शेतकऱ्यांच्या हाता- तोंडाशी आलेला घास जाऊ देणार नाही. 2008 ची कर्जमाफी अटींसह होती. आता तसे होऊ नये अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे  आम्ही निकष ठरवत  असल्याचं सांगितलं. मात्र हे निकष शेतकरी नुकसानीचे असू नयेत असं मी त्यांना सांगितलं, असं उद्धव म्हणाले. साले म्हणणाऱ्यांना शेतकरी धडा शिकवतील शेतकऱ्यांविरोधात जे जे बोलले, मग ते अजित पवार असो वा शेतकऱ्यांना साले म्हणणारे (रावसाहेब दानवे) असो, शेतकरी प्रत्येकाला धडा शिकवतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला तुच्छतेची वागणूक मिळत असल्याची खंतही उद्धव यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
Sunil Sehlke : आमदार सुनील शेळके आणि आरटीआय कार्यकर्त्यांमध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात खडाजंगी? आरोप-प्रत्यारोप अन पोलिसात तक्रारी!
आमदार सुनील शेळके आणि आरटीआय कार्यकर्त्यांमध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात खडाजंगी?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गाव दत्तक अभियान, मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलं अंतरवली सराटी गाव दत्तक 
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गाव दत्तक अभियान, मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलं अंतरवली सराटी गाव दत्तक 

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Embed widget