एक्स्प्लोर

आम्ही लेचेपेचे नाही, केंद्राने मदत नाही दिली तरी झुकणार नाहीत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सांगलीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, नवीन मिळालेले सहकारी मजबूत आहेत. आमचा संघ उत्तम आहे, संघ म्हणजे टीम, नको तो वाद नको असे म्हणत त्यांनी संघाला टोला लगावला.

सांगली : शिवसेना कधी दिल्लीसमोर झुकणार नाही. शिवसेना सोबत होती म्हणून भाजपचे खासदार देखील निवडून आले आहेत. केंद्राचे सरकार राज्याचे पालक असायला पाहिजे. मात्र केंद्र सरकार मदत देताना दुजाभाव करत ना चा पाढा वाचत असेल तरीही दिल्ली समोर आम्ही झुकणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. देशाची अर्थव्यवस्था कोमात गेलीय, कुणामुळे कोमात गेली हे पाहिले पाहिजे. यातून देशाला बाहेर काढले पाहिजे, असेही ते म्हणाले. सांगलीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, नवीन मिळालेले सहकारी मजबूत आहेत. आमचा संघ उत्तम आहे, संघ म्हणजे टीम, नको तो वाद नको असे म्हणत त्यांनी संघाला टोला लगावला. ते म्हणाले की, दूध उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना योग्य दाम देणं गरजेचं आहे. पशु धन चांगले राहण्यासाठी फिरतं चिकित्सालय सुरु करतोय. आम्ही पालकत्वाची भूमिका कधीही सोडणार नाही. उद्योगपतींना राज्यातच गुंतवणूक करण्याची विनंती केली आहे. माझा संघ उत्तम आहे. हे सरकार सूड काढणारं नाही, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, शेतकरी सर्वात महत्वाचे आहेत. शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांसाठी काम करण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. आता पूर्ण करण्याची संधी मला मिळाली. सहकार क्षेत्र आधीही मरू देणार नाही, पण शेतकऱ्याचं हित सर्वात आधी ठेवलं पाहिजे, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, 2 लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच आहोत. 2 लाखावरील देखील शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असेही ते म्हणाले. यावेळी जयंत पाटील यांची स्तुती करताना ते म्हणाले की, जयंत राव तुम्ही सगळे कार्यक्रमच करून टाकले आहेत. मी जयंत पाटील यांचे भाषण मन देऊन ऐकतो. जयंतराव बोलताना आपल्याला वाटते आपले कौतुक करतात. गुदगुल्या होतात पण घरी गेल्यावर कळते की त्यांच्या भाषणाने आपले ओरबडे निघतात. जयंतरावांनी ही तहसील कार्यालयाची इमारत उभारण्यासाठी चालू पणा करत स्वतः अर्थमंत्री असताना मोठा निधी या इमारतीसाठी मंजूर केला. कारण पुन्हा आपले सरकार येईल हे त्यांना वाटत नव्हते, अशी फिरकीही त्यांनी घेतली.

महत्त्वाच्या बातम्या

Dharashiv: आधी बाचाबाची, नंतर भवानी ज्योत घेऊन जाणाऱ्या तरुणांना शटर बंद करून पोलिसांची मारहाण? तुळजापुरात नेमकं काय घडलं?
आधी बाचाबाची, नंतर भवानी ज्योत घेऊन जाणाऱ्या तरुणांना शटर बंद करून पोलिसांची मारहाण? तुळजापुरात नेमकं काय घडलं?
Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune: MPSC च्या आंदोलनस्थळी येताच विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
MPSC च्या आंदोलनस्थळी येताच घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
Team India Squad World Cup 2027 : 10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश
10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune: MPSC च्या आंदोलनस्थळी येताच विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
MPSC च्या आंदोलनस्थळी येताच घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Embed widget