एक्स्प्लोर

NMC Elections 2022 : दोन लाख मतदार वाढले ; प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध : मनपा आयुक्त

प्रारुप मतदार यादीबाबत हरकती व सुचना 23 जून ते 1 जुलै दरम्यान प्रभागाचे झोन कार्यालयात व निवडणूक कक्ष मुख्यालयात लेखी स्वरुपात सादर करता येईल. अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.

नागपूरः मनपाच्या 2017 वर्षी झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी सुमारे दोन लाख मतदार वाढले आहे. मतदार याद्यांचे विभाजन करतांना लेखनिकांकडून झालेल्या चुका दुरुस्तीसाठी प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी मनपाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.  या संदर्भातील दुरुस्त्या करण्या संबंधाने हरकती व सुचना असल्यास 23 जून ते 1 जुलै या कालावधीत संबधीत प्रभागाचे क्षेत्रिय झोन कार्यालयात व निवडणूक कक्ष मुख्यालयात लेखी स्वरुपात द्यावा असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

वरील कालावधीत मतदार यादीत होणाऱ्या चुका, मतदारांचा चुकून प्रभाग बदलने, विधानसभेच्या यादीत नांव असूनही प्रभागाच्या यादीत नांव नसने, या संदर्भातील दुरुस्ती करता येणार आहे. यासंदर्भातील हरकती व सुचना संबधीत मनपाचे झोन कार्यालयात किंवा निवडणूक कक्ष मुख्यालय, सिव्हिल लाईन्स येथे कार्यालयीन वेळेत हरकती व सुचना लेखी स्वरुपात द्याव्या. दाखल सुचना हरकतीवर निर्णय घेवून प्रभाग निहाय अंतीम मतदार यादी 9 जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. उपरोक्त माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी पत्रकार परिषदेत दिले. यावेळी अति.आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, सहा.आयुक्त महेश धामेचा उपस्थित होते.

* नागपूर महानगरपालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्याः 24,47,494
(सन 2011 चे जनगणनेनुसार)
* अनुसूचित जातीची लोकसंख्या (लगतच्या जनगणनेनुसार) : 4,80,759
* अनुसूचित जमातीची लोकसंख्या (लगतच्या जनगणनेनुसार) : 1,88,444
* प्रभागाची एकूण संख्या (त्रिसदस्यीय प्रभाग) : 52
* निवडूण द्यावयाच्या महानगरपालिका संदस्यांची संख्या : 156

राज्य निवडणूक आयोगाच्या 23 मे  च्या आदेशानूसार अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्या करीता आरक्षण सोडतीचा 31 मे रोजी कार्यक्रम राबविण्यात येऊन आरक्षित जागांची अंतिम अधिसूचना 13 जून रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. उपरोक्त अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने 2 जुन व 16 जुन अन्वये मतदार यादीचा कार्यक्रम 1 जानेवारी ही अर्हता दिनांक धरुन भारत निवडणूक आयोगाकडून 31 मे 2022 पर्यंत अद्यावत केलेली विधानसभेची मतदार यादी वापरुन प्रारुप मतदार यादी तयार करण्याबाबतचे आदेश व मतदार यादीचा पुढील प्रमाणे कार्यक्रम जाहीर केलेला आहे.

या तारखांना प्रसिद्ध होणार मतदार याद्या

*प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी 23 जून 2022 रोजी प्रकाशित करण्यात आली.
*प्रारुप मतदार यादीवर हरकती व सुचना 23 जून ते 01 जुलै दरम्यान दाखल करता येईल.
* अंतिम प्रभाग निहाय मतदार यादी 9 जुलै रोजी प्रसिद्ध केल्या जाईल.

येथे बघा मतदार यादी

उपरोक्त कार्यक्रमानुसार 31 मे 2022 पर्यंत विधानसभेच्या मतदार यादी मध्ये समाविष्ट झालेल्या / वगळलेल्या / दुरुस्त्या इत्यादी विचारात घेऊन प्रभाग निहाय मतदार याद्यांचे विभाजन करुन प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी 23 जून पासून नागपूर महानगरपालिकेच्या सर्व झोन कार्यालयात तसेच मुख्य कार्यालयात तसेच  nmcnagpurelection.org/nmcnagpur.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार यादीत भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभेच्या अद्यावत मतदार यादी व्यतिरिक्त नविन नावाचा समावेश करणे, नावे वगळणे इत्यादी स्वरुपाची कार्यवाही मा. राज्य निवडणूक आयोगाकाडून केली जात नाही.

वाचा NMC Elections 2022 : मतदार याद्यांमध्ये गोंधळ ; मनपा निवडणूक लांबणार?

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 October 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
Abhijeet Dipke : राहुल गांधींना ताब्यात घेताच अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आता विरोधी पक्षनेत्यालाही...
राहुल गांधींना ताब्यात घेताच अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आता विरोधी पक्षनेत्यालाही...
देशातील सर्वात स्वच्छ शहर संकटात, रस्त्यांवर लागले कचऱ्याचे ढीग, नेमकं काय आहे कारण? 
देशातील सर्वात स्वच्छ शहर संकटात, रस्त्यांवर लागले कचऱ्याचे ढीग, नेमकं काय आहे कारण? 

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget