एक्स्प्लोर

NMC Elections 2022 : मतदार याद्यांमध्ये गोंधळ ; मनपा निवडणूक लांबणार?

मतदारांच्या नावांच्या अनुक्रमांकात घोळ असल्याने निवडणूक आयोगाला 17 जूनला मतदार याद्या प्रसिद्ध करता आल्या नाहीत. यात दुरुस्तीची कामे सुरु असून 23 जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

नागपूरः नागपूर महानगरपालिका निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांतील गोंधळामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मतदारांच्या नावांच्या अनुक्रमांकात घोळ असल्याने राज्य निवडणूक आयोगाला 17 जूनला मतदार याद्या प्रसिद्ध करता आल्या नाहीत. आता या मतदार याद्यांमध्ये दुरुस्तीची कामे सुरु असून 23 जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे आता निवडणुकीची सर्वच प्रक्रिया लांबणार असल्याची चिन्हे आहेत.

त्यामुळे जुन-जुलैला अपेक्षित मनपा निवडणुका गणपती विसर्जनानंतरच होण्याची शक्यता आहे. नागपूरसह बृहन्मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती महानगरपालिकेच्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा 17 जून हा दिवस निवडणूक आयोगाने निश्चित केला होता. 2 जूनला मतदार याद्यांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यानुसार 17 जूनला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार होत्या. परंतु राज्यभरातील महानगरपालिकांनी तयार केलेल्या मतदार याद्यांमध्ये दोष आढळून आला. त्यामुळे आता निवडणूक आयोगाला मतदार यादी प्रसिद्ध करणे, हरकत मागविणे, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रमात बदल करावा लागला आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 23 जूनला प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 1 जुलैपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 9 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील, असे मनपातील सूत्रांनी सांगितले. निवडणूक आयोजाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. प्रभागनिहाय मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात.

या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदीं संदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात. परंतु महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय याद्या तयार करताना अनेक मतदारांचे अनुक्रमांक चुकल्याची बाब पुढे आली. त्यामुळे राज्यातील सर्वच महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला.

अनेकजण अनभिज्ञ

जुन्या कार्यक्रमानुसार 17 जूनला मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. त्यामुळे 17 जूनला अनेक इच्छुक झोन कार्यालयांमध्ये मतदार यादी बघण्यासाठी गेले होते. परंतु त्यांची निराशा झाली. नव्या कार्यक्रमाबाबत महानरपालिकेने माहिती प्रसिद्ध करणे आवश्यक होते, परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेकांना उगाच झोन कार्यालयात फेरा मारावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा नशीब पालटणारा; 5 राशींना थेट धनलाभाचे संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा नशीब पालटणारा; 5 राशींना थेट धनलाभाचे संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Adil Hussain On Bhagavad Gita: 'श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता...'; अभिनेते आदिल हुसैन यांचं वक्तव्य चर्चेत, भगवद्गगीतेबाबत म्हणाले...
'श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता...'; अभिनेते आदिल हुसैन यांचं वक्तव्य चर्चेत, भगवद्गगीतेबाबत म्हणाले...
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News: शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Embed widget