Handicap Dilivery Agent Video : सोशल मीडियावर (Social Media) रील लाईफपेक्षा (Reel Life) हटके व्हिडीओ रिअल लाईफमध्ये (Real Life) पाहायला मिळतात. हे व्हिडीओ लोक आवडीने पाहतातही आणि काही व्हिडीओ अनेकांना भावूकही करतात. या व्हिडीओमुळे कुठेनाकुठे पाहणाऱ्या प्रत्येक यूजरला आयुष्यातील संघर्षाशी सामना करण्यासाठी बळ मिळतं. सोशल मीडियावर अनेकदा डिलिव्हरी एजंटचे (Dilivery Agent) व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. पण, सध्या सोशल मीडियावर एका डिलिव्हरी एजंटचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण डिलिव्हरी बॉयच्या धाडसाचं कौतुक करत आहेत.


ट्विटरवर एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक दिव्यांग डिलिव्हरी एजंट फूड डिलिव्हरी करतोय. पण, या व्हिडीओत एक गोष्ट मात्र, प्रकर्षाने जाणवतेय ती म्हणजे, या डिलिव्हरी बॉयच्या चेहऱ्यावरील हास्य. आयुष्यात इतका मोठा संघर्ष असूनही त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचं हसू जरा कमी झालेलं नाही. व्हिडीओमध्ये दिसणार्‍या या धाडसी डिलिव्हरी एजंटचं हास्य अनेकांना प्रेरणा देणारं आहे. सोशल मीडिया यूजर्सला हा व्हायरल व्हिडीओ खूप आवडला असून हा व्हिडीओ अनेकजण शेअरही करत आहेत. 


पाहा व्हिडीओ : 






यूजर्स डिलिव्हरी एजंटचे चाहते झाले  


जर तुम्ही आयुष्यात एखाद्या अडचणीत असाल आणि तुम्ही आलेल्या परिस्थितीसमोर हार मानली असेल तर व्हिडीओमध्ये दिसणारा हा फूड डिलिव्हरी एजंट तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. हिमांशू नावाच्या युजरने @himanshuk783 आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एक डिलिव्हरी एजंट शारीरिक व्यंग असूनही स्वत:च्या पायावर उभा राहून उदरनिर्वाहासाठी डिलिव्हरीचे काम करतोय. या एजंटच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून कोणालाही प्रोत्साहन मिळेल. हा व्हिडीओ ऑनलाईन खूप व्हायरल झाला आहे. या बातमी लिहेपर्यंत 27 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर, 41 लोकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Virat Kohli : जेवणाचं पार्सल पाहताच कोहलीचा बदलला मूड; व्हिडीओ शेअर करत चाहत्यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया