Virat Kohli Reaction On Chole Bhature : भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Australia) यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना दिल्लीत खेळला जात आहे. या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) बाद झाला. सामन्यात बाद झाल्यामुळे विराट चांगलाच संतापला होता. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट कोहली टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी काही संवाद साधत आहे. पण त्यांच्या संवादा दरम्यान एक स्टाफ मेंबर ड्रेसिंग रूममध्ये येतो आणि विराटला हातातील खाण्याचं पार्सल देतो. ते पार्सल पाहून विराटचा मूड पूर्णपणे बदलतो. विराट कोहलीचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून या व्हिडीओवर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही चाहत्यांचं म्हणणं आहे की, त्यात छोले भटुरेच असतील.

  


खरंतर, दिल्लीच्या प्रसिद्ध छोले भटुरेवर विराटचं असलेलं प्रेम त्याच्या चाहत्यांपासून लपलेलं नाही. विराटने आपल्या मुलाखतीत अनेकवेळा हे मान्य केलं आहे की त्याला दिल्लीचे छोले भटुरे किती आवडतात आणि जेव्हाही संधी मिळते तेव्हा तो छोले भटुरेंचा अगदी मनमुरादपणे आस्वाद घेतो. जेव्हा ड्रेसिंग रूममधील स्टाफ मेंबर विराट कोहलीसाठी पार्सल घेऊन आला तेव्हा विराटच्या डोळ्यांत एक वेगळाच आनंदाचा भाव होता. अशातच या पार्सलमध्ये नेमकं काय असणार असा अंदाज चाहते लावत आहेत. चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहून विराट खूपच खूश झाला आहे.










दरम्यान, सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी ट्विट करून खात्रीने सांगितलं आहे की, आलेल्या पार्सलमध्ये छोले भटुरेच असतील. विशेष म्हणजे यामध्ये झोमॅटोनेही ट्विट केलं आहे. याचं कारण म्हणजे, नोव्हेंबर 2017 मध्ये 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स'च्या एका एपिसोडमध्ये त्याला दिल्लीचे छोले भटुरे किती आवडतात हे सांगितले होते.


दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहली 84 चेंडूत 44 धावा करून बाद झाला. सामन्या दरम्यान कोहली दमदार खेळी खेळत होता पण त्याला नशीबाची साथ मिळाली नाही. अंपायरने त्याला एलबीडब्ल्यू म्हटले. पण, बॉल प्रथम पॅडला लागला की बॅटला याचा कोणताही निर्णायक पुरावा टेलिव्हिजन रिप्लेमध्ये आढळला नाही. अखेर मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवण्यात आला आणि कोहलीला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.


महत्त्वाच्या बातम्या : 


IND vs AUS 2nd Test : भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, अश्विन-जडेजा विजयाचे शिल्पकार; मालिकेत भारताला 2-0 ची आघाडी