Viral Video: भारतीय संस्कृतीत नवरा-बायकोचं नातं हे खूप पवित्र मानलं जातं. एकाच नव्हे तर सात जन्माच्या बंधनांने पती-पत्नी बांधले गेल्याचा विश्वास आपल्या संस्कृतीमध्ये आहे. पण अलिकडच्या काळात तरुणांनी अंगिकारलेल्या पाश्चात्य संस्कृतीतील चुकीच्या गोष्टींमुळे, त्याच्या वाढत्या प्रभावामुळे या नात्याला काहीसा तडा जात असल्याचं दिसून येतंय. त्यात वाईफ स्वॅपिंग म्हणजे पत्नींच्या अदलाबदलीचे काही प्रकारही सातत्याने समोर येतात. अजनबी चित्रपटात असंच काहीसं दाखवलं गेलं होतं. पण खऱ्या आयुष्यात दोन जोडप्यांनी असाच काहीसा केलेला धक्कादायक प्रकार ऐकून तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटेल. 


भारताबाहेर वाईफ स्वापिंगचा ट्रेंड सध्या जोर धरताना दिसत आहे. दोन विवाहित जोडपी अशी आहेत जी आपल्या पत्नींची नेहमी अदलाबदली करतात. विशेष म्हणजे हे चौघंही एकत्र राहतात. चौघांचं हे एक कुटुंबच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. धक्कादायक बाब म्हणजे एकमेकांच्या पत्नींसोबत असतानाचा एक व्हिडीओ त्यांनी सोशल मिडियावरदेखील शेअर केला आहे. 


अॅलिसिया आणि टायलर रॉजर्स हे जोडपं सुरुवातीला त्यांच्या दोन मुलांसोबत एकत्र राहत होते. नंतर त्यांची ओळख एका विवाहित कपलशी झाली ज्यांचं नाव होतं शॉन आणि ताया. आता हे चौघे 2020 पासून एकत्र राहतात आणि तेव्हापासून ते एकमेकांच्या पत्नींची अदलाबदली करतात. या अदलाबदलीतून त्यांच्या पत्नी अॅलिसिया आणि ताया या प्रेग्नन्ट झाल्या आणि त्यांनी दोन मुलांना जन्म दिला.


 






या विचित्र मिलनातून झालेल्या मुलांचे जैविक वडील नेमकं कोण हे त्यांना माहित नाही. एका पोर्टलशी बोलताना त्यांनी सांगितलं की त्यांना मुलांचे वडील कोण आहेत याच्याशी घेणं देणं नाही, तर मुलांना चांगलं प्रेम आणि संस्कार देणं अधिक महत्त्वाचं आहे. 


Polyfamory: पॉलिफेमरी- पत्नींची अदलाबदली


एकमेकांच्या पत्नींची अदलाबदली करुन शारीरिक सुख घेण्याची संकल्पना अलिकडच्या काळात वाढताना दिसत आहे. या संकल्पनेला पॉलिफेमरी (polyfamory) असं म्हटलं जातं. यात एकापेक्षा जास्त पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवले जातात. काही वेळा या रिलेशनशिप रोमँटिकसुद्धा असतात असं या जोडप्यांच्या वागण्यावरुन दिसतंय.  


अॅलिसिया-टायलर आणि शॉन-ताया यांचं हे अजब कुटुंब याच पॉलिफेमरीचा भाग आहेत. चौघांचं हे कुटुंब सध्या लेबनॉन ओरेगॉन इथे राहतं. त्यांचे इंस्टाग्रामवर बक्कळ फॉलोअर्स आहेत. त्यांनी सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. अशा अजब गुंतागुंतीच्या नात्यांमुळे खूप ट्रोलिंग सहन करावं लागतं.


ही बातमी वाचा :