Most Expensive Pillow : अनेकांना उशी नसेल तर झोप लागत नाही. पण एका उशीची (World's Most Expensive Pillow)  किंमत ऐकल्यावर तुमची झोप उडू शकते. जगातील सर्वात महाग उशीची किंमत किती असेल? असा विचार अनेकांनी केला नसेल. जाणून घेऊयात जगातील सर्वात महाग उशीबाबत...


काय आहे खास?


एका वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार, "टेलरमेड पिलो"  (Tailormade Pillow) ही ​​जगातील सर्वात महाग आणि खास उशी आहे. ही उशी इजिप्शियन कापूस आणि रेशीम यांपासून बनवलेली आहे. या उशीमध्ये गैर-विषारी डच मेमरी फोम भरलेले आहे. नेदरलँडच्या थिज व्हॅन डेर हिल्स्टने ही उशी तयार केली आहे. या उशीची किंमत आर्किटेक्चरल डायजेस्टनुसार 57,000 डॉरल म्हणजेच जवळपास 45 लाख रुपये आहे. 


24 कॅरेट सोने, हिरा आणि नीलमपासून तयार झाली उशी
ही खास उशी तयार करण्यासाठी डिझायनर हिल्स्टला 15 वर्षे लागली. या उशीवर 24 कॅरेट सोने, हिरा आणि नीलम जडलेला आहे. उशीमध्ये कापूस भरण्यासाठ रोबोट मिलिंग मशीनचा वापर करण्यात आला. उशीला 24 कॅरेट सोन्याचे कव्हर आहे. या उशीला एक चमकदार फॅब्रिक कव्हर आहे जे सुरक्षित आणि शांत झोपेसाठी सर्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन निर्माण करते. उशीमध्ये एक जिपर आहे ज्यामध्ये 22.5-कॅरेट नीलम आणि चार हिरे आहेत. या उशीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


पाहा व्हिडीओ:



कस्टम-मेड आहे ही खास उशी 
उशीला एका ब्रँडेड बॉक्समध्ये पॅक केलं जातं. डिझायनर हिल्स्टचा दावा आहे की उशी निद्रानाश असलेल्या लोकांना शांतपणे झोपण्यास मदत करेल. ही उशी प्रत्येक ग्राहकासाठी कस्टम-मेड आहे. उशी बनवण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीचे खांदे, डोके आणि मान यांचे अचूक परिमाण 3D स्कॅनर वापरून काळजीपूर्वक मोजले जातात. 


संबंधित इतर बातम्या