नवी दिल्ली: विराट कोहली (Virat Kohli) हा जगभरातल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक, अन् तितकाच लोकप्रियही. खेळाप्रति एखाद्याने किती प्रामाणिक असावं, झोकून देऊन कसं काम करावं आणि आपली फिटनेस कशी सांभाळावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे विराट कोहली. त्यामुळेच आज कोट्यवधी चाहत्यांच्या गळ्यातील तो ताईत बनल्याचं दिसतंय. चाहते त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी, त्याची एक झलक पाहण्यासाठी किती उत्सुक असतात हे आपल्याला नेहमीच दिसतंय. पण जर तुम्ही विराटचे डाय हार्ट फॅन असाल आणि त्याची भेट घेणं शक्य नसेल तर काय? अशावेळी तुम्ही विराटच्या एखाद्या फोटोजवळ किंवा पुतळ्याजवळ जाऊन सेल्फी घ्याल. पण विराटची एक चाहती अशीही आहे की जिने विराटच्या मेनाच्या पुतळ्याला थेट किस केलं अन् त्याचा व्हिडीओही केला. दिल्लीतील मादाम तुसॉ वॅक्स म्युझिअममध्ये (Madame Tussauds Wax Museum) हा व्हिडीओ शूट करण्यात आला असून तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 


Virat Kohli Viral Video: विराटच्या मेनाच्या पुतळ्याला किस केलं


दिल्लीतील मादाम तुसॉ वॅक्स म्युझिअममध्ये विराट कोहलीचा मेनाचा पुतळा उभा करण्यात आला आहे. यामध्ये टीम इंडियाच्या ब्लू जर्सीमध्ये विराट कोहलीचा बँटिंग करतानाचा हा पुतळा दिसतोय. या ठिकाणी रोज हजारो लोक भेट देतात. दोन दिवसांपूर्वी अशीच एक तरुणी या ठिकाणी आली. प्रत्यक्ष विराट कोहलीला भेटता येत नाही म्हणून काय झालं? त्याच्या पुतळ्यासोबत तर आपण व्हिडीओ काढू असा काहीसा विचार तिच्या मनात आला असेल. 


या तरुणीने थेट विराटच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात टाकला आणि त्याला किस केलं. त्यानंतर तिने आपले गालही विराटच्या पुतळ्याच्या ओठांवर टेकवले. त्यावेळी त्या तरुणीच्या अदा काही वेगळ्याच होत्या. ही तरुणी विराटच्या पुतळ्याला किस करत असताना तिच्याच मित्राने किंवा मैत्रिणीने हा व्हिडीओ शूट केल्याचं दिसतंय. 


 






Woman Kisses Virat Kohli: व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल 


दिल्लीतील मादाम तुसॉ वॅक्स म्युझिअममध्ये काढण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. विराटच्या संबंधित व्हिडीओ व्हायरल होत असताना मग त्याचे फॅन यापासून दूर कसे राहतील. विराटच्या असंख्य चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही लोकांनी याला क्रेझी असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी हे सर्व भन्नाट असल्याचं म्हटलंय.


हा पुतळा मेनाचा असल्याने असं जर कोणी याला स्पर्श करत असेल तर त्या पुतळ्याचं नुकसान होईल अशी चिंताही काहीजणांनी व्यक्त केली आहे. हा पुतळा तयार करण्यासाठी खूप मेहनत घेण्यात आली असून अशा प्रकारच्या बेजबाबदार कृत्याने त्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे असं काहीजणांनी म्हटलंय. 


Anushka Sharma: अनुष्का शर्माला टॅग केलं


काही नेटिझन्सनी हा व्हिडीओ शेअर करत त्यात विराटची पत्नी अनुष्का शर्माला टॅग केलं आहे. 'ये देखनेसे में मर क्यूं नहीं गयी' अशा कमेंट्स यावर करण्यात आल्या आहेत. 


ही बातमी वाचा: