Virat Kohli 25,000 Runs In International Cricket : रन मशीन विराट कोहलीनं (Virat kohli) आज आणखी एक विक्रमाचं शिखर पार केलेय. विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आज 25 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात दिल्ली कसोटीमधील दुसऱ्या डावात बारावी धाव घेताच विराट कोहलीनं 25 हजार धावांचा टप्पा पार केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावांचा पल्ला पार करणारा विराट कोहली सहावा फलंदाज ठरला आहे. तर दुसरा भारतीय खेळाडू ठरला. विराट कोहलीनं सर्वात वेगानं 25 हजार धावांचा टप्पा पार केला आहे, याबाबतीत त्यानं सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलेय.
सचिनला टाकले मागे -
विराट कोहलीनं सर्वात कमी डावात 25 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. विराट कोहलीपूर्वी सचिन तेंडुलकरने 577 डावात 25 हजार धावांचा टप्पा पार केला होता. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याला 588 डाव लागले होते. विराट कोहलीनं 549 डावात 25 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
विराट कोहलीने 31313 चेंडूचा सामना करताना विराट कोहलीने 25 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. 2008 मध्ये विराट कोहलीनं भारतीय संघात पदार्पण केले होते. तेव्हापासून विराट कोहली टीम इंडियाचा सदस्य आहेत. तो वनडे, कसोटी आणि टी 20 संघाचा भाग आहे. विराट कोहलीनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12 हजार धावांचा टप्पा पार केलाय. त्याशिवाय कसोटीत विराट कोहलीच्या नावावर 27 शतकांची नोंद आहे.
विराट कोहलीने 492 सामन्यात पार केला 25 हजारांचा टप्पा
विराट कोहलीने तिन्ही फॉर्मेटमध्ये आतापर्यंत 492 सामने खेळले आहेत. कोहलीने कसोटीत आतापर्यंत 8195 धावा केल्या आहेत. तर वनडेमध्ये 12809 धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. तर टी20 मध्ये विराट कोहलीने आतापर्यंत 4008 धावांचा पाऊस पाडला आहे.
25 हजार धावांचा टप्पा पार करणारे सहा फलंदाज आहेत. यामध्ये सचिन तेंडुकलर, विराट कोहली आणि रिकी पाँटिंगच्याशिवाय कुमार संगकारा, महेला जयर्वधने आणि जॅक कॅलिस या नावाचा समावेश आहे.
आणखी वाचा:
IND vs AUS : पहिल्या सामन्यात हार्दिक कर्णधार, वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची निवड
अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड, कुणाला मिळाली संधी?