New Business Start Ups : अनेकांच्या डोक्यात भिन्न कल्पना असतात. मात्र, त्यातील फार कमी कल्पना प्रत्यक्षात साकारल्या जातात. हिंगोलीतील (Hingoli) एका तरुणाने डोक्यातील अशीच एक कल्पना वास्तव्यात उतरवली आहे. या तरुणाने शेणाचा (Dung) वापर करत वॉलपेंट ( Wall Paint) तयार केला आहे. शेणाच्या वापरामुळे उत्पादन खर्च (Production Cost) कमी येत असल्याने या पेंटची किंमत कमी आहे. 


हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli News) वाघजाळी येथील उच्च शिक्षित युवक सचिन तांबिले यांनी शेणापासून रंग निर्मितीचा उद्योग सुरू केला आहे.  युवा उद्योजक झालेल्या सचिन तांबिले यांनी नेहमीच काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, नेमके काय नवीन करायचे, याबाबत त्यांच्या मनात संभ्रम होता. नवीन उद्योग (Business Idea) नेमका कसा करायचा, याबाबत विचार सुरू होता. त्या दरम्यानच, सचिन तांबिले यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari Speech) यांच्या भाषणाने वाट दाखवली. 


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण ऐकताना शेणापासून रंग (Paint From Dung) तयार केला जाऊ शकतो हे सचिन तांबिले यांना समजलं. त्यानंतर त्यांनी या प्रकल्पावर काम करणे सुरू केले. या आयडियावर काम करताना विविध माहिती त्यांनी घेतली. सचिन यांनी स्वतःच्या शेतात असलेल्या गाईच्या शेणापासून रंग तयार करण्याचं ठरवलं.  त्यासाठी त्यांनी 26 लाख रुपये खर्च करून एक छोटी कंपनी उभी केली. रंग तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, मशीन आणि इतर कच्चा माल खरेदी करून ही कंपनी सुरू केली. या कंपनीत सर्व प्रकारचे वॉलपेंट तयार केले जातात. या वॉलपेंटमध्ये  25 टक्के शेण आणि 75 टक्के इतर संबंधित कच्च्या मालाचा समावेश आहे. 


शेणापासून तयार केलेल्या हा वॉल पेंट इतर केमिकल वापरून तयार केलेल्या रंगाच्या तुलनेत खूप फायदेशीर आहे. इतर वॉल पेंटच्या तुलनेत किंमतही कमी आहे. त्याशिवाय, अतिरिक्त आर्थिक खर्च कमी होत असल्याने ग्राहकदेखील मोठ्या प्रमाणावर या रंगाच्या खरेदीला प्राधान्य देताना दिसत आहे. कल्पकता आणि जिद्दीच्या बळावर असे नाविन्यपूर्ण उद्योग यशस्वी करता येतात असे म्हटले जाते. आता, हा उद्योगही त्याचे उदाहरण ठरू लागले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: