Jarwa Tribe Kills Children with Fair Skin : अनेक लोकांना आपलं बाळं गोरं, गुटगुटीत व्हावं अशी इच्छा असते. यासाठी महिला गर्भवती असताना अनेक उपाय केले जातात. गर्भवती महिलेला वेगवेगळे पदार्थ खायला दिले जातात. तिच्या आहाराची विशेष काळजी घेतली जाते. अर्थात या गोष्टी गुणसुत्रांवर अबलंबून असतात. पण या उपायांमुळे बाळं गोरं जन्माला येतं, असा काहींचा समज आहे. दरम्यान भारतात असंही एक ठिकाणी आहे, जिथे गोरं बाळ जन्माला येणं अशुभ मानलं जातं. गोरं बाळ जन्माला आल्यावर येथे क्रूरपणे नवजात बाळाची हत्या केली जाते.


भारताचा केंद्रशासित प्रदेश असलेल्या अंदमान बेटावर ही क्रूर परंपरा पाळली जाते. अंदमानमधील जारवा (Jarwa Tribe) आदिवासी जमातीच्या लोकांमध्ये आजतागायत ही क्रूर आणि विचित्र परंपरा पाळली जाते. ही जमात जगातील सर्वात जुन्या जमातींपैकी एक आहे. जारवा समुदायामध्ये घरामध्ये गोरं बाळ जन्माला येणं अशुभ मानलं जातं. येथे गोरं बाळ जन्माला आल्यावर त्याची क्रूरपणे हत्या केली जाते. 


काय 'ही' क्रूर परंपरा आहे?


जारवा आदिवासी जमाती ही मूळ आफ्रिकेतील मानली जाते. या जमातीतील लोकांची त्वचा काळ्या रंगाची असते. या समुदायामध्ये जर एखाद्या महिलेने गोऱ्या बाळाला जन्म दिला तर त्या बाळाला मारलं जातं. हे जन्मलेलं मूल दुसऱ्या जमातीचं असल्याचं मानलं जातं, त्यामुळे गोऱ्या नवजात बाळाची क्रूरपणे हत्या केली जाते.


जारवा आदिवासींमध्ये आणखी एक अनोखी परंपरा पाळली जाते. येथे जन्मलेल्या मुलाला संपूर्ण कुळातील महिलांचे दूध पाजले जाते. सर्व महिलांचे स्तनपान हे समाजाची पवित्रता राखण्यासाठी आवश्यक असल्याचं या जमातीतील लोकांचं मानणं आहे. मीडिया रिपोर्ट्सवर, ही जमात 90 च्या दशकात समोर आली होती, पण भारत सरकारने त्यांचे फोटो काढणे किंवा सोशल मीडियावर अपलोड करण्याबाबत कठोर कायदे केले आहेत. जर कोणी त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करताना आढळले तर त्याला तुरुंगात जावे लागू शकते आणि दंडही होऊ शकतो.


खोलवर रुतली आहेत अंधश्रद्धेची मुळे 


जारवा आदिवासी जमातीत अंधश्रद्धेची मुळे खूप खोलवर रुतली आहेत. गरोदर महिलेला प्राण्याचे रक्त पाजल्यास तिचे मूल काळे होईल, अशी येथील लोकांमध्ये मान्यता आहे. इथे फक्त काळ्या रंगाच्या मुलांनाच समाजात राहण्याची मान्यता मिळते. जारवा आदिवासी जमात आजही मुख्‍य प्रवाहातील समाजापासून वंचित आहे. या जमातीतील लोक विना कपड्यांचे जीवन जगत आहे. या आदिवासी जमातीतील बहुतेक लोक माशांची शिकार करुन उदरनिर्वाह करतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Marriage : 'येथे' लग्नाआधीच द्यावा लागतो मुलांना जन्म; भारतातील काही विचित्र प्रथांबद्दल वाचा सविस्तर