Viral News : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि सचिन तेंडुलकरची लेक सारा या दोघींसोबत भारताचा स्टार युवा खेळाडू शुभमन गिल याचं नाव जोडलं जात आहे. सोशल मीडियावर त्यांच्या नावाची नेहमीच चर्चा असते. शुभमन गिल याचं नाव कधी सारा अली खान तर कधी सारा तेंडुलकरसोबत जोडलं जाते. इतकेच काय तर स्टेडिअममध्ये सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षकही शुभमन गिल याला सारा सारा या नावाने चिडवत असल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. आता शुभमन गिल याचा एक फोटो पुन्हा व्हायरल झाला आहे. हा फोटो सारा अली खान आणि शुभमन गिल यांचा असल्याचं बोललं जात आहे.


सोशल मीडियावर शुभमन गिल आणि सारा अली खान यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये दोघेही विमानतळावरील लाँजमध्ये बसल्याचं दिसत आहे. हा फोटो मॉर्फ आहे की खरा याचीही चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. पण या फोटोमुळे गिल आणि सारा यांच्या अफेअरची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या अखेरच्या टी 20 सामन्यानंतर भारतीय संघातील खेळाडू रवाना झाले होते.. त्यावेळी विमानतळावरील हा फोटो असल्याचं बोललं जात आहे. तर काहींच्या मते हा फोटो एडिटेड अथवा मॉर्फ केलेला आहे.  






शुभमन गिल याने जेव्हा जेव्हा चांगली खेळी केली तेव्हा तेव्हा त्याची आणि साराच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरु होते. याआधीही द्विशतक झळकावल्यानंतर गिल आणि सारा यांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर उडाली होती. भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांचेही नाव अनेकदा जोडलं गेलं आहे. त्याशिवाय गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान आणि शुभमन गिल यांच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या आहेत.  


आणखी वाचा :


Shubman Gill : शुभमनला क्रिकेटच्या मैदानावर पाहताच चाहत्यांकडून साराच्या नावाच्या घोषणा; पण ही सारा कोण? नेटकऱ्यांना पडला प्रश्न


शुभमनची आवडती अभिनेत्री कोण?


सारा अली खान आणि शुभमन अनेकदा डिनर आणि पार्टीमध्ये एकत्र स्पॉट झाले आहेत.  गेल्या वर्षी एका शुभमनला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आले की, 'बॉलिवूडमधील तुझी सर्वात आवडती अभिनेत्री कोण आहे?; क्षणाचाही विलंब न करता शुभमनने लगेच साराचे नाव घेतले होते. पुढे त्याला प्रश्न विचारण्यात आला की, 'तू साराला डेट करतोय का?' या प्रश्नाचं उत्तर देत शुभमन म्हणाला, 'सारा का सारा सच बोल दिया. कदाचित हो कदाचित नाही.' शुभमनच्या या उत्तराने अनेकांचे लक्ष वेधले.