World's Richest Dog Gunther VI : जगातील अनेक श्रीमंत व्यक्तींबद्दल तुम्ही ऐकलं असेल, पण कधी तुम्ही श्रीमंत प्राण्यांबद्दल ऐकलं आहे का? जगातील असेही काही प्राणी आहेत, जे सर्वसामान्य माणसापेक्षाही जास्त श्रीमंत आहेत. जगातील सर्वात श्रीमंत कुत्र्याबद्दल (World's Richest Pet) आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या कुत्र्याचा बंगला आणि त्याची काळजी घेण्यासाठी नोकर-चाकरही आहेत. जगातील सर्वात श्रीमंत कुत्र्याची संपत्ती 655 कोटी आहे. गंथर VI (Gunther VI) हा जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. 


जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा गंथर IV 


गंथर VI (Gunther VI) नावाचा कुत्रा जगातील सर्वात श्रीमंत (Gunther VI is World's Richest Dog) आहे. गंथर VI हा जर्मन शेफर्ड (German Shepherd) जातीचा कुत्रा आहे. गंथर VI या कुत्र्याची संपत्ती सुमारे 655 कोटी रुपये आहे. या कुत्र्यासाठी अनेक नोकर असून एक पर्सनल ट्रेनरही आहे. जगातील सर्वात श्रीमंत प्राण्यांच्या यादीत गंथर VI चा पहिला क्रमांक आहे.


लवकरच येणार डॉक्युमेंट्री 


डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, जर्मन शेफर्ड प्रजातीचा हा कुत्रा पॉप स्टार मॅडोनाच्या पूर्वीच्या घरात राहतो आणि एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे अतिशय आरामदायक जीवन जगत आहे. लवकरच गंथरच्या आयुष्यावरील डॉक्युमेंटरी 'गंथर मिलियन्स' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. गंथर VI शी संबंधित अनेक धक्कादायक माहिती या डॉक्युमेंट्री सांगण्यात आली आहे. यामध्ये कुत्र्याच्या मालमत्तेव्यतिरिक्त कुत्र्याने ही संपत्ती कशी कमावली हे देखील सांगण्यात आलं आहे.


अब्जाधीश कुत्र्याची कहाणी


या कुत्र्यावर डॉक्युमेंटरी बनवणाऱ्या डायरेक्टर ऑरेलियन लेटरजी यांनी सांगितले की, त्याची कथा खरोखरच धक्कादायक आहे. कुत्रा इतका श्रीमंत कसा असू शकतो आणि ही संपत्ती खर्च कशी करु शकतो. गंथर कशाप्रकारे आयुष्य जगतो हे ऐकून सर्वांनाच धक्का बसेल. अधिकाधिक लोकांना या कुत्र्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. त्यामुळेच या डॉक्युमेटरीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.


कुत्र्याला अशी मिळाली मालमत्ता


रिपोर्टनुसार, या कुत्र्याला त्याच्या मालकाकडून ही संपत्ती वारसाहक्काने मिळाली आहे. लिबेन्स्टीन कुटुंबाचा गंथर VI हा कुत्रा. जर्मन काउंटेस कार्लोटा लिबेन्स्टीन यांचा मुलगा गंथरने आत्महत्या केली. त्यांना इतर कोणीही वारसदार नव्हता. मृत्यूपूर्वी 1992 मध्ये त्यांनी एक ट्रस्ट तयार केला आणि आपल्या लाडक्या कुत्र्यासाठी 6.5 अब्ज रुपयांपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता सोडली. गंथर VI हा कुत्रा एका इटालियन फार्मासिटिकल कंपनीचा मालक देखील आहे.