Weirdest Job Advertisement : प्रत्येकजण आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी नोकरी किंवा छोटा-मोठा व्यवसाय करत असतो. कोरोनाच्या काळात जगभरात अनेकांनी नोकऱ्या (Jobs) गमावल्या. तर, काही लोकांनी या काळात नवीन स्टार्टअप्स आणि काहींनी विचित्र गोष्टी करुन सोशल मीडियाद्वारे मोठी कमाई केली. अनेकदा काही नोकऱ्या त्यांच्या कामामुळे किंवा भरघोस पगारामुळे प्रसिद्धीच्या झोतात येतात. आज आपण अशाच एका नोकरीबद्दल जाणून घेऊया, ज्यामध्ये चांगला पगार आणि राहण्यासाठी फुकट घर देखील दिलं जातं, पण काही अटी ऐकून लोक ते काम करण्यास नकार देतात.


विचारल्या जातात वैयक्तिक आयुष्याशी संबंधित सवयी


आपल्या जगात दोन प्रकारचे लोक राहतात. प्रथम असे लोक जे पूर्ण शाकाहारी आहेत आणि कोणत्याही प्रकारची नशा करत नाहीत. दुसरे म्हणजे असे लोक, जे अन्न खाताना कोणतेही बंधन पाळत नाहीत, शाकाहार करतात आणि दारुॉॉक८ग आणि सिगारेट पिणं सामान्य मानतात. तर यामागचं कारण म्हणजे, या नोकरीसाठी शाकाहारी उमेदवार शोधला जात आहे.


कोणत्या देशात आहे ही नोकरी?


आपल्या देशात अशा अधिकृत नोकऱ्या सहसा मिळत नाहीत, पण आपल्या शेजारी असलेल्या चीनमध्ये (China) एका नोकरीच्या जाहिरातीने खळबळ उडवून दिली आहे. चिनी सोशल मीडियावर ही जाहिरात पाहून चिनी लोक आश्चर्यचकित झाले आहेत. कारण चीन हा एक असा देश आहे, जिथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक माणूस झुरळ, किडे असे अनेक प्रकारचे कीटक तसेच प्राणी खातात. ज्या देशांत प्राणी-कीटकांना खाद्य मानलं जातं अशा देशात नोकरीसाठी शाकाहारी उमेदवाराची मागणी केली जाणं हे थोडं आश्चर्याचंच आहे.


नोकरीसाठी प्रसिद्ध केली जाहिरात


साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीनच्या दक्षिणेकडील शेनझेनमधील एका कंपनीने नोकरीसाठी अशी जाहिरात दिली आहे, ज्यामध्ये विचित्र मागण्या करण्यात आल्या आहेत आणि सोशल मीडियावर लोक त्या पोस्टवर प्रश्न विचारत आहेत. ही जाहिरात 8 जुलै रोजी प्रसिद्ध झाली आहे आणि 50,000 युआन (सुमारे 60,000 रुपये) मासिक पगारासह ऑपरेशन्स आणि मर्चेंडायझर्ससाठी नोकऱ्या देते. कर्मचार्‍यांसाठी राहण्याची मोफत सोय देखील दिली जाते. मात्र यासाठी उमेदवाराला काही अटी पूर्ण कराव्या लागतात.


अटी ऐकून लोकांचा नोकरीला नकार


कंपनीची अट अशी आहे की, कंपनीसाठी केवळ अशा लोकांनाच नोकरीसाठी अर्ज करण्याची परवानगी आहे, जे दयाळू असतील, चांगले वागणारे असतील, जे धूम्रपान करत नाहीत आणि दारु पित नाहीत. उमेदवार संपूर्ण शाकाहारी असला पाहिजे. कंपनीच्या एचआर विभागाचं म्हणणं आहे की, जर तुम्ही मांस खाल्लं तर तुम्ही एखाद्या प्राण्याची हत्या करत आहात आणि ही एक प्रकारची क्रूरता आहे. ती या कंपनीची संस्कृती नाही. कंपनीच्या कॅन्टीनमध्ये देखील मांस दिले जात नाही. जे या कंपनीत काम करतात, त्यांना हे सर्व नियम पाळावे लागतात.


हेही वाचा:


Bihar Population: मुलगाच हवा... या हट्टामुळे बिहारची लोकसंख्या अनियंत्रित! पाहा विचार करायला लावणारा 'हा' प्रकार