Bihar Population Facts : मुलगा हा मुलगाच असतो... आम्हाला मुलगी नको, मुलगा हवा... दोन मुली असल्या तरी काही प्रॉब्लेम नाही, पण एक तरी मुलगा हवाच! ही आहे बिहारमधील (Bihar) लोकांची मानसिकता. तुम्हाला वाटेल की आजच्या युगात या गोष्टींचा कोण विचार करतं? हे विचार जुने झाली आणि आता लोक असा विचार करत नाहीत. पण, बिहारमध्ये अशी स्थिती नाही. आजही बिहारमधील लोकांची इच्छा आहे की त्यांच्या अपत्यांमध्ये एक तरी मुलगा असावा. एवढंच नाही, तर आजही लोक मुलाच्या (Boy) हव्यासापोटी एकामागून एक मुलांना जन्म देत आहेत. ही बाब राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून समोर आली आहे.


बिहारमधील लोकसंख्या नियंत्रणाबाहेर


बिहारमधील लोक अजूनही पुत्रप्राप्तीसाठी वारंवार मुलांना जन्म देत असल्याचं सर्वेक्षणात आढळून आलं आहे. यामुळे बिहारच्या लोकसंख्येमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे आणि प्रजनन दरातही वाढ झालेली आहे. बिहारमधील लोकांमध्ये मुलगाच हवा हा हट्ट किती प्रमाणात आहे, हे आज जाणून घेऊया. मुलगा (Boy) आणि मुलगी (Girl) यांमधील कशाला ते पसंती दर्शवतात हे देखील पाहूया, ज्याच्या आधारे बिहारमधील लोकसंख्या आटोक्यात येत नसल्याचे बोललं जात आहे.


पुत्रप्राप्तीच्या हव्यासापोटी प्रजनन दर वाढला


मुलगाच हवा! या इच्छेमुळे बिहारमधील प्रजनन दर वेगाने वाढत आहे. सध्या प्रजनन दर 3 वर आला आहे, परंतु तो 2.3 वर जाऊ शकतो, असं देखील म्हटलं जातं आहे. आता पुत्रप्राप्तीच्या हव्यासापोटी लोकांना 2 मुली होऊनही तिसरं अपत्य होत आहे. त्यामुळे प्रजनन दरातील ही कपात अतिशय संथ गतीने होत आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-3 मध्ये हा दर 4 होता, नंतर 3.4 आणि आता तो 3 झाला आहे. 


राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवालातून काय स्पष्ट?


राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवालानुसार,



  • बिहारमधील 31 टक्के महिला आणि 22 टक्के पुरुषांना मुलीऐवजी मुलगा हवा आहे.

  • 70 टक्के लोक असे आहेत जे मुलगा होण्यासाठी अधिक अपत्य जन्माला घालतात.

  • 91 टक्के महिलांना किमान एक तरी मुलगा हवा आहे.

  • 85 टक्के पुरुषांनाही मुलगा हवा असतो.


मुलगा झाल्यावर दुसरे अपत्य नको


जिथे मुली होऊनही स्त्रिया आपल्या इच्छेनुसार मुलगा द्यायला तयार असतात, तर दुसरीकडे दोन मुलं झाल्यानंतर तिसर्‍या अपत्यासाठी स्त्रिया तयार नसतात. या अहवालानुसार, 83 महिला अशा आहेत ज्यांना दोन मुलं झाल्यानंतर तिसरे अपत्य नको आहे. त्याच वेळी, 73 टक्के महिला अशा आहेत, ज्या मुलगा झाल्यानंतर आणखी मुलांना जन्म देऊ इच्छित नाहीत. बिहारमध्ये केवळ पुत्रप्राप्तीच्या हव्यासापोटी लोकसंख्येवर नियंत्रण नाही, हे यावरून स्पष्ट होतं.


हेही वाचा:


Smartphone Use : लहान मुलांनी किती तास मोबाईल वापरणं सुरक्षित? 'या'पेक्षा जास्त वेळ वापरायला द्याल तर होईल मोठं नुकसान