India News: इंदूरमध्ये (Indore) आंबे खाल्ल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. महिलेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून ही धक्कादायक बाब समोर आली. फॉरेन्सिक टीमला आंब्यामध्ये संशयास्पद विष आढळून आलं आहे, या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. पण अशा परिस्थितीत मनात प्रश्न येतो की, आंबे (Mangoes) खाल्ल्याने खरंच कुणाचा जीव जाऊ शकतो का? तसं पाहिलं तर, आजकाल आंबा पिकवण्यासाठी रसायनांचा (Chemical) वापर केला जातो. त्यामुळे शरीरावर त्याचा कसा परिणाम होईल सांगता येत नाही. या प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेऊया.


केमिकल्स टाकून पिकवले जातात आंबे


आंब्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि इतर पोषक घटक आढळतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. आंब्याचा पुरवठा (Supply) वाढवण्यासाठी आणि त्याचा ताजेपणा (Freshness) दीर्घकाळ टिकवण्यासाठी ते रासायनिक पद्धतीने पिकवले जातात आणि यासाठी विषारी रसायनं वापरली जातात, ज्यामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. केमिकलमध्ये (Chemical) पिकवलेले आंबे विषारी असू शकतात. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) या केमिकलचे दुष्परिणाम स्पष्ट केले आहेत आणि त्याची चाचणी करण्याचे सोपे मार्ग सुचवले आहेत.


विषारी मसाल्यांपासून पिकवले जातात आंबे


FSSAI मध्ये स्पष्ट केल्यानुसार, आंबा कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जातो. कॅल्शियम कार्बाइडला 'मसाला' असंही म्हणतात. आंब्याव्यतिरिक्त केळी, पपई आणि इतर फळं पिकवण्यासाठी देखील या रसायनाचा वापर केला जातो. यातून अ‍ॅसिटिलीन गॅस तयार होतो आणि या गॅसमुळे आंबा पिकतो. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) कॅल्शियम कार्बाइडचे खालील दुष्परिणाम स्पष्ट केले आहेत.


आंबा पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकलचे शरीरावर होणारे परिणाम


1. उलट्या होणे
2. चिडचिड
3. जास्त तहान
4. अशक्तपणा
5. चक्कर येणे
6. गिळण्यास समस्या
7. अल्सर आणि इतर त्वचेच्या समस्या


रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याची ओळख


केमिकल वापरुन आंबे पिकवल्यावर त्यांचा रंग, आकार आणि चव बदलते. वरुन पाहिल्यास, कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे नैसर्गिक आंब्यासारखेच दिसतात, परंतु त्यात पोषक तत्वांची कमतरता असू शकते आणि त्याचे शरीरावर दुष्परिणाम देखील होऊ शकतात. FSSAI ने म्हंटल्यानुसार, तुम्ही काळे डाग असलेले आंबे विकत घेणं टाळावं, कारण त्यात कॅल्शियम कार्बाइडपासून तयार होणारा अ‍ॅसिटिलीन गॅस असू शकतो. कोणतेही फळ खाण्यापूर्वी ते चांगलं धुवावं. FSSAI च्या म्हणण्यानुसार, ज्या आंब्यावर काळे डाग आहेत ते केमिकलने पिकवलेले असतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


हेही वाचा:


Latur Tomato Farmer: लातूरचे शेतकरी बंधू टोमॅटोतून बनणार कोट्यधीश! दर वाढल्याचा जबरदस्त फायदा