भारतीय मानक ब्युरोमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; दरमहा 70 हजार वेतन मिळणार

Jobs 2023: तुम्हाला 'ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स'मध्ये नोकरी करायची असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सनं यंग प्रोफेशनल्सच्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

उमेदवार bis.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट आहे.
रिक्त पदांचा तपशील: या भर्ती मोहिमेद्वारे यंग प्रोफेशनल्सची 15 पदं भरली जातील.
पात्रता: अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दहावी/बारावी/ग्रॅज्युएशन/BE/B.Tech पदवी/डिप्लोमा मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून आणि इतर विहित पात्रता आणि कामाचा अनुभव असावा.
वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं कमाल वय 35 वर्ष निश्चित करण्यात आलं आहे.
निवड प्रक्रिया: शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा, मुलाखत इत्यादीसाठी बोलावलं जाईल. उमेदवारांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीनं नियुक्त केलं जाईल.
पगार: या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 70,000 रुपये पगार मिळेल.