Cockroach Farming : जग फार मोठं आहे आणि इथे तुम्हाला अनेक विचित्र गोष्टी पाहायला मिळतील. जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला विविध प्रकारचे प्राणी, विविध शैलीचे लोक आणि त्यांच्या खाण्याच्या सवयी पाहायला मिळतात. प्रांताप्रांतानुसार खाण्याच्या सवयींमध्ये (Food Habits) खूप बदल होतो. जगातील काही लोक शाकाहारी (Vegetarians) आहेत, तर काही लोक मांसाहारी (Non-vegetarians). बऱ्याच जणांचे खाण्याचे पदार्थ असे असतात ज्यांची कल्पना करणं देखील कठीण असतं. साप (Snake), कीटक (Insects) यांचे सेवन करणारे लोक देखील जगात आहेत. आता साप आणि कीटकं त्यांचे खाद्यपदार्थ असतील तर त्यांचा पुरवठा असणं देखील आवश्यक आहे आणि त्यामुळेच अनेक ठिकाणी साप आणि कीटकांचीही शेती केली जाते.


झुरळांचीही केली जाते शेती


साप आणि झुरळांसह (Cockroach) कीटकांची देखील शेती केली जाते हे ऐकून तुम्ही अचंबित व्हाल, पण हे पोल्ट्री फार्मसारखंच आहे. मधासाठी मधमाश्या (Honeybees) पाळल्या जातात, त्याच पद्धतीने कीटकांचीही शेती केली जाते. किडे पाहून काही लोक घाबरतात, तर काही ठिकाणी हेच किडे खाद्यपदार्थ म्हणून खाल्ले जातात. आपल्याला किडे दिसले तर आपण भीतीने त्यांना मारुन टाकतो, पण काही देशांत त्यांना मारण्याऐवजी ते मोठ्या प्रमाणात पाळले जातात.


'या' देशात होते कीटकांची शेती


कीटकांच्या शेतीबद्दल ऐकून तुम्हाला ते विचित्र वाटेल, परंतु चीनमधील (China) लोकांसाठी हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. जसं भारतात मत्स्य शेती (Fish Farming) केली जाते, मधुमाशी पालन केलं जातं, कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म उभारले जातात, तशाच प्रमाणे चीनमध्ये मोठ्या प्रमाणात किडे-कीटक पाळले जातात. चीनमध्ये किड्यांची निर्मिती देखील केली जाते. झुरळांची लागवड कशी होते ते पाहा...






आवडीने खातात लोक


चीनमध्ये लोक कीटकांना (Insects) प्रोटीन्सचा मुख्य स्त्रोत (Protein Source) मानतात, म्हणून ते मोठ्या संख्येने किडे पाळतात आणि ते स्नॅक्स किंवा स्टार्टर म्हणून खाल्ले जातात. चीनमध्ये अगदी लहान मुलांना देखील कीटक खायला दिले जातात आणि लहान मुलंसुद्धा मज्जा घेत कीटकांची चव चाखतात. चीन आपल्या विचित्र खाद्यपदार्थांसाठी नेहमीच जगात प्रसिद्ध आहे, अशा स्थितीत या कीटकांची चीनमध्ये होणारी लागवड पाहून यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.


हेही वाचा:


America Gold Rates: अमेरिकेत खूप कमी लोक घालतात सोन्याचे दागिने; जाणून घ्या अमेरिकेतील सोन्याची किंमत