Snake Viral Video: सध्या राज्यात सर्वदूर पाऊस होत असल्यानं कोरड्या पडलेल्या विहिरींमध्ये पाणी दिसू लागलंय. खरीपाच्या पेरण्या झाल्यानं सिंचनाच्या कामांसाठी शेतात शेतकऱ्यांची रोजची चक्कर ठरलेली असते. सध्या शिवार हिरवंगार झालं असलं तरी विंचू, काट्यांसह शेतात लपलेल्या सापांपासून स्वत:चा जीव वाचवणं मोठं जीकिरीचं काम. पावसाळ्यात शेतातल्या बिळांमध्ये पाणी साठल्यानं साप वर येतात. कधी उतरत्या छपरांच्या खाली तर कधी अडगळीच्या कुठल्यातरी सांधीत लपून बसलेल्या सापांचा वाढता धोकाही मोठा आहे. अशावेळी शेतात किती जपून पाय टाकावा लागत असेल! याची कल्पना येईल. 


सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल


पावसाळ्यात शेतकऱ्याला मोटर चालू किंवा बंद करण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावं लागतं. एकवेळ दिवसा शेतात जाणं फायद्याचं असतं.अनेकदा शेतात लाईट नसल्यानं शेतकऱ्यांना रात्रीही मोटर चालू करण्यासाठी जावं लागतं. पण अशावेळी शेतात कुठेही साप असू शकतो. त्यामुळं अन्नाच्या शोधात नाग, साप शिवारांमध्ये आढळतात. एका शेतकऱ्यासोबत असंच काहीसं झालं. मोटार चालू करायला गेलेल्या शेतकऱ्याला डीपीमध्ये कोबरा लपून बसलेला दिसला. हे वेळीच त्याच्या लक्षात आल्यानं तो बाजूला झाला. सोशल मिडीयावर सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. विजेच्या मोटारच्या डिपीमध्ये लपून बसलेल्या या सापाचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल


शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी


सर्पमित्र निलेश पाटील नामक प्रोफाईलवरून  इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून मोटार सुरु करण्यास गेलेल्या कोणासही इथे साप असेल असे दिसून येत नाही. परंतू डिपीच्या एका कोपऱ्यात बल्बच्या खाली तो दिसल्यानं शेतकरी सावध झाला. या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना मोटर चालू करताना काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. पण मोटार चालू करायला गेलेल्या एका शेतकऱ्यासोबत काय झालं पहा..


 






अनवाणी पायानं शेतात जाऊ नका


सध्या पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साठल्यानं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सापाची भीती आहे. अनवाणी पायाने शेतात न जाण्याचा सल्लाही देण्यात येतो. अनेकदा योग्य काळजी न घेतल्यानं ही भीती जीवघेणी ठरू शकते.


कोणत्या जातीचा हा साप आहे?


नाग जातीचा हा विषारी कोबरा असल्याचं सांगण्यात येत आहे. या सापाचा रंग तपकिरी पिवळसर असून राखाडी किंवा काळ्या चेक्सचा हा साप ५ किंवा ६ फूटांचा असल्याचं सांगण्यात येतं. हा साप प्रामुख्यानं जुन्या पडक्या घरांमध्ये दिसून येतो. शेती किंवा मनुष्य वस्तीत दगड विटांच्या खाली हा दडून बसण्याची अधिक शक्यता असते. हा साप बेडूक किंवा उंदीर खात असल्यानं विषारी कोबरा जीवघेणा ठरू शकतो. .


हेही वाचा:


नागाने काढला फणा, 3 मुंगसांनी घातली झडप; विमानतळावरील झुंज, व्हिडिओ व्हायरल