मुंबई : राज्य सरकारची सर्वात मोठी आणि महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास आजपासूनच सुरुवात झाली आहे. राज्य सरकारे 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 रुपये एकाच दिवशी जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, आजपासूनच ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आमदार राम सातपुते यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. तसेच, महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या आपल्या भाषणातून या योजनेबाबत जनजागृती करत असून विरोधकांच्या टीकेलाही उत्तर देत आहेत.


बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. 3-4 दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनचे पवित्र औचित्य साधून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. 31 जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांच्या लाभाची रक्कम, प्रत्येकी 3000 रुपये वर्ग करण्यात आले आहेत. 31 जुलै नंतर अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे, असे ट्विट आमदार सातपुते यांनी केले आहे. 


राज्यात 1 कोटी 40 लाख महिलांची नोंंदणी पूर्ण


मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना चालू होऊन एक महिनाही झालेला नाही. राज्यात 1 कोटी 40 लाख महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. शासन-प्रशासनाच्या मेहनतीमुळं हे शक्य झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी शासन स्तरावर दहा महिन्यांपासून काम सुरू होते. या योजनेसाठी 33 हजार कोटी आर्थ‍िक तरतूद करण्यात आली आहे. ही यापुढेही कायम सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तसेच, ज्या महिला भगिनींना या दोन महिन्यांचा लाभ मिळाला नाही, त्यांना सप्टेंबर महिन्यात एकूण 3 महिन्यांचा थेट लाभ मिळणार असून 4500 रुपये त्यांच्या बँक अकाऊंटवर जमा होतील, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं आहे. 




''एकतर पाकिस्तान भारतात दिसेल, नाहीतर इतिहासातून नष्ट होईल''; योगी आदित्यनाथ कडाडले 


भाजपात जाण्यासाठी गडबड झाली का?; अशोक चव्हाणांनी दिलं उत्तर, विधानसभेबाबतही बोलले