पाटणा : मुंगूस पाहायला मिळणे हा शुभ शकून मानला जातो, त्यामुळेच मुंगूसाचं दर्शन झाल्यानंतर अनेकजण मोठ्या आनंदाने ही वार्ता देत असतात. तर, कुठं मुंगूस (Moongus) आणि नागाची झुंज दिसून आल्यानंतरही विलक्षण क्षण पाहिल्याचा आनंद होतो. मात्र, आता चक्क विमानतळावरील धावपट्टीवरच मुंगूस अन् नागाची झुंज पाहायला मिळाली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. बिहारमधील लोकनायक जयप्रकाश नारायण पाटणा (Patana) विमानतळावरावर (Airport) हे दुर्लभ चित्र आज दिसून आलं. विशेष म्हणजे विमानतळावरील या व्हिडिओत तीन मुंगूस आणि एका नागाची लढाई दिसून येते. 


मुंगूस आणि नागाचं जन्मोजन्मीचं वैर असतं, ही सर्वसाधारण धारणा आहे. अनेक हिंदी चित्रपटातूनही मुंगूस आणि नागाची लढाई, त्यांच्यातील वैर दर्शवण्यात आलं आहे. दोघांची नजरानजर झाल्यास सामना होतोच, एकमेकांसमोर ते आले की लढाई सुरू होतेच. पाटणा विमानतळावरील धावपट्टीवरही एक नाग फणा काढून उभा असल्याचं दिसून येतं. तर, या नागावर तीन मुंगूस झडप घालतात, नागाला लक्ष्य करुन तीन मुंगूस त्याच्यावर तुटून पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, तितक्याच तीव्रतेने नागही प्रतिकार करत असल्याचे दिसून येते. 37 सेकंदाच्या या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून घटनेनं आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, या व्हिडिओवर नेटीझन्स कमेंट करुन आपलं मत मांडत आहेत. तर, हा व्हिडिओ 3-4 दिवसांपूर्वीचा असल्याचंही काहींनी म्हटलं आहे.     


मुंगूस सूर्याचे प्रतीक 


ज्योतिषशास्त्रात मुंगूस हे सूर्याचे प्रतीक आहे. ज्योतिषशास्त्रात अनेक शुभ चिन्हे त्याच्याशी संबंधित आहेत.  मुंगूस तुमच्या जीवनात सूर्याप्रमाणे चमक आणतो. असे मानले जाते की, एखाद्या व्यक्तीला सकाळी लवकर मुंगूस दिसला तर त्याने समजावे की, लवकरच  धनलाभ होण्याची शक्यता आहे. 


परिसरात दिसणे शुभ की अशुभ?


सकाळी उठल्याबरोबर परिसरात  मुंगूस दिसला तर लवकरच सात दिवसात तुम्हाला धनाशी संबंधित शुभवार्ता मिळणार आहे. कुठेतरी जाताना एखादा मुंगूस तुमचा रस्ता ओलांडला तर समजा तुमची सर्व कामे शुभ होणार आहेत. कोर्टात जाताना जर तुम्हाला मुंगूस दिसला तर तुमचे काम यशस्वी होणार आहे. एखाद्या कामासाठी जात असताना एखादा मुंगूस तुमचा रस्ता ओलांडला तर तुम्हाला त्या कामात यश मिळेल.


हेही वाचा


दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, बोर्डाकडून 2025 च्या परीक्षेच्या आयोजनात मोठा बदल, जाणून घ्या