Viral Video : मुंबईत चालत्या ट्रेनमधून पडलेल्या महिलेसाठी रेल्वे होमगार्ड एक देवदूत बनून आला होता. त्या होमगार्डमुळे महिलेचा जीव वाचला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. चालत्या ट्रेनमधून उतरण्याच्या घाईत ही महिला ट्रेनमधून पडली. मुंबई रेल्वेत तैनात असलेल्या होमगार्डने प्लॅटफॉर्मवर पडलेल्या एका महिला प्रवाशाचा जीव वाचवला. ही घटना मुंबईतील जोगेश्वरी स्थानकाची असल्याचे सांगण्यात येत आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
चालत्या ट्रेनमध्ये महिला प्लॅटफॉर्मवर कशी पडते आणि होमगार्डच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला, हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. या महिलेला ट्रेनची धडक लागण्यापूर्वीच होमगार्डने तिला खेचले, त्यावेळी महिला प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील गॅपमध्ये अडकण्यापासून वाचली. व्हिडिओमध्ये, महिला ट्रेनमधून पडताच होमगार्ड जवानानेही प्लॅटफॉर्मवर उडी मारली आणि लगेचच महिलेला ट्रेनमधून खेचले. त्यामुळे ही महिला ट्रेनमधून पडून थोडक्यात बचावली. रेल्वे प्रवासा दरम्यान अनेक प्रवासी चालत्या ट्रेनमधून उडी मारताना दिसतात, त्यावेळी जीआरपीने प्रवाशांना चालत्या ट्रेनमध्ये चढणे किंवा उतरण्याची मनाई केली आहे कारण ते जीवघेणे असू शकते.
गार्डचा सन्मान करण्याचा निर्णय
चालत्या ट्रेनमधून फलाटावर पडलेल्या महिलेचा जीव वाचवणाऱ्या होमगार्ड जवानाचे नाव अल्ताफ शेख असल्याचे सांगण्यात येत आहे. अल्ताफ शेखला त्याच्या या कार्याबद्दल गौरव करण्याचा निर्णय रेल्वे पोलिसांनी घेतला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त (रेल्वे) कैसर खालिद म्हणाले की, होमगार्डला त्याच्या सतर्कतेसाठी बक्षीस देण्यात येत आहे. याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली, 16/4/22 रोजी जोगेश्वरी स्थानकावर ट्रेनमध्ये चढताना पडलेल्या महिला प्रवाशाचा जीव GRP मुंबई येथे कार्यरत असताना होमगार्ड अल्ताफ शेख यांनी वाचवला. त्यांची सजगता, सतर्कता आणि कर्तव्याची निष्ठा यासाठी त्यांना पुरस्कार देण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या :