Trending News : महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आनंद महिंद्रा नेहमी आपल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. नुकतीच त्यांनी केलेली एक पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्यांनी या पोस्टमध्ये टेस्लाचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांना टॅग केलं आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांना 'भारतीय देशी टेस्ला' दाखवली आहे. 


आनंद महिंद्रा यांनी या पोस्टला एलॉन मस्क यांना टॅग केलं आहे. या पोस्टला कॅप्शन देत त्यांनी 'Back to the Future' म्हणजेच 'पुन्हा भविष्याकडे' असं म्हटलं आहे. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये एका बैलगाडीवरून दोन व्यक्ती शेतातून घरी जाताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत महिंद्रा यांनी म्हटलं आहे की, या गाडीसाठी नेविगेशनसाठी गूगल मॅपचीही गरज पडत नाही.






 


आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे की, ही मूळ देशी टेस्ला आहे. यासाठी कोणत्याही प्रकारच्या इंधनाची गरज नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. ही पूर्णपणे सुरक्षित आहे. काम संपल्यानंतर घरी जाताना तुम्ही विश्रांतीसह एक डुलकीही घेऊ शकता आणि ही गाडी तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे तेथे घेऊन जाईल.


उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी भारतीय बैलगाडीच्या गुणवत्तेची तुलना टेस्लाच्या गुणवत्तेशी केली आहे. सध्या एलॉन मस्क यांनी आनंद महिंद्रा यांच्या पोस्टवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र नेटकरी ही पोस्ट मोठ्या संख्येने शेअर करत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :