Trending News : सध्या सोशल मीडियावर पशु-पक्षांचे प्राण्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. काही व्हिडीओमध्ये तर वन्य प्राण्यांच्या शिकारीमुळे बरेचसे व्हिडीओ खूप भीतीदायक आणि वेदनादायक वातता. तर काही व्हिडीओ अक्षरश: अतिशय गोंडस आणि हृदय पिळवटून टाकणारे आहेत. असाच सोशल मिडीयावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे तो म्हणजे जिराफ आणि लहान मुलाचा.     


वास्तविक, सोशल मीडियावर जंगली प्राण्यांना आवडणाऱ्या लोकांची संख्या चांगली आहे, त्यामुळे सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक लहान गोंडस मुलगा जिराफाबरोबर खेळताना दिसत आहे. त्याचबरोबर जिराफही मुलासोबत मस्ती करताना दिसत आहे.


पाहा हा व्हिडीओ : 






जिराफ हा अतिशय शांत प्राणी असल्याचे सामान्यतः दिसून येते, तर अनेक प्रसंगी रागाच्या भरात तो तोंडाने डोक्यावर जखमाही करू शकतो. जिराफाने केलेल्या दुखापतीमुळे एखाद्याचा जीव सहज जाऊ शकतो. या व्हिडिओमध्ये दिसणारा जिराफ अतिशय शांत स्वभावाचा असल्याचे दिसत आहे. जो मुलाबरोबर एकदम प्रेमाने खेळताना दिसत आहे.  


जिराफाला मुलासोबत खेळताना पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर लाखो व्ह्यूजसह एक लाख 16 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ नेटकऱ्यांची मने जिंकताना दिसत आहे. त्यामुळे अनेक यूजर्स व्हिडीओवर प्रतिक्रिया सकारात्मक देताना दिसत आहेत.


महत्वाच्या बातम्या :