Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज विचित्र आणि आश्चर्यकारक व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहिल्यानंतर काही यूजर्स संताप व्यक्त करतात. आता पुन्हा एकदा एक असाच व्हिडीओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या भावाच्या अस्थी स्विमिंग पूलमध्ये विसर्जित करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून महिलेला ट्रोल केले जात आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून काही यूजर्सक़ून संताप व्यक्त होत आहे, तर काही जणांकडून मजेशीर कमेंट केल्या जात आहेत. एकदा पाहाच...
भावाच्या अस्थी स्विमिंग पूलमध्ये विसर्जित केल्या....
ही घटना स्पेनच्या इबिझा क्लबमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचा ड्रेस घातलेली एक महिला स्विमिंग पूलमध्ये आनंदाने नाचत असल्याचे दिसून येते. स्विमिंग पूलमध्ये मोठ्या संख्येने लोक पार्टी करण्यासाठी आले होते. महिलाही याचा एक भाग बनली. जोपर्यंत ती नाचत होती तोपर्यंत बरं होतं. पण स्विमिंग पूलमध्ये स्वत:च्या भावाच्या अस्थी टाकून या महिलेने मर्यादा ओलांडली, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. या महिलेने भावाच्या अस्थींची राख अशी पाण्यात ओतली, जणू ती एखादी पावडर शिंपडत आहे. हे करत असताना तिच्या चेहऱ्यावर तसं केल्याचा जराही पश्चाताप नव्हता.
...आणि स्विमिंग पूलमध्ये जोमाने नाचताना दिसली महिला
आपल्या भावाच्या अस्थी पाण्यात ओतल्यानंतर ही महिला स्विमिंग पूलमध्ये जोमाने नाचताना दिसली. एवढेच नाही तर तिच्या एका मित्राने केलेल्या या कृत्याचा व्हिडिओही इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्स संतापले आहेत.
युजर्सनी दिल्या संमिश्र प्रतिक्रिया
एक युजर म्हणाला, 'अरे देवा. मी पाहिलेली ही सर्वात अशोभनीय गोष्ट आहे. आणखी एका युजरने म्हटले की, 'फिजीच्या स्विमिंग पूलमध्ये मानवी राख टाकणे अत्यंत गंभीर आहे.' काही लोकांनी व्हिडीओवर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, 'माझी राख विसर्जित करतानाही असं काही केलं तरी, कोणतीच अडचण येणार नाही.' तर दुसरा म्हणाला, 'माझ्या अस्थीच्या राखेचेही असेच कोणी करावे.'
इतर संबंधित बातम्या
Viral Video : लग्नासाठी मुलगा मिळेल का? चक्क बॅनर हातात घेऊन 'ती' सध्या रस्त्यावर फिरतेय, जोडीदार शोधण्यासाठी अनोखा स्टंट