Viral Video : अनेकदा काही लोक जोडीदाराच्या शोधात मॅट्रिमोनियल साइट्स (Matrimonial Sites) किंवा डेटिंग अ‍ॅप्सची (Dating Apps) मदत घेतात, पण काही लोक असे असतात जे जोडीदार शोधण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करतात. सध्या एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. जाणून घ्या.


 


तिला हवा जोडीदार! 
एका विशिष्ट वयानंतर, प्रत्येकजण जीवनाच्या प्रवासात, त्यांच्या सुख-दु:खात त्यांच्याबरोबर चालणारा जोडीदार शोधतो. अनेकदा लोक आपल्या खास व्यक्तीच्या शोधात वैवाहिक संकेतस्थळ म्हणजेच मॅट्रिमोनियल साइट्स किंवा डेटिंग अ‍ॅप्सचा अवलंब करतात. अशा परिस्थितीत जे भाग्यवान असतात त्यांना त्यांचा जोडीदार अगदी सहज सापडतो, परंतु काही लोकांना जोडीदार शोधण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. काही लोक जोडीदार शोधण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरतात. नुकताच सोशल मीडियावर अशाच एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जी पतीच्या शोधात हातात बॅनर घेऊन रस्त्यावर फिरत आहे.


 






 



डेटिंग अ‍ॅप्सपेक्षा तिचा या पद्धतीवर अधिक विश्वास
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, व्हायरल व्हिडीओमध्ये दिसलेल्या मुलीचे नाव कॅरोलिना गीट्स असल्याचे सांगितले जात आहे, ती मॅनहॅटनची रहिवासी आहे, जी नुकतीच हातात बॅनर घेऊन फिरताना दिसली आहे. ज्यामध्ये 'Looking for a husband' (मी नवरा शोधत आहे) असे लिहिले आहे. अनेकदा काही लोक जोडीदाराच्या शोधात मॅट्रिमोनियल साइट्स किंवा डेटिंग अ‍ॅप्सची मदत घेतात, पण कॅरोलिना गीट्सचा असा विश्वास आहे की डेटिंग अ‍ॅप्सपेक्षा तिचा या पद्धतीवर अधिक विश्वास आहे.


 







सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियाकडे जगभरात सर्वात शक्तिशाली साधन म्हणून पाहिले जाते. त्याच्या मदतीने माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज पाठवता येते. पण सोशल मीडियानेही अनेक लोकांना लोकांना रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली आहे. या 5 फूट 9 इंच सुंदर ब्युटी इन्फ्लुएंसरची फॅन फॉलोइंग खूप मोठी असली तरी ती स्वत: तिच्या हातात पोस्टर घेऊन तिच्या शोधात बाहेर पडली आहे. जेव्हा अवघ्या जगाला हे पोस्टर दिसेल तेव्हा मला नेमकं काय हवंय ते कळेल, असा तिचं म्हणणं आहे. त्यामुळेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पाहिला जात आहे आणि खूप पसंत केला जात आहे.


इतर बातम्या


Viral Video : अचानक रस्त्यावर 'लाल पाण्याचा पूर', पण ही तर 'रेड वाईन नदी!' दृश्य पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का