Viral Video : इंटरनेटच्या युगात सर्व प्रकारचे व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतात, साधारणपणे, लोकांना नृत्याशी संबंधित व्हिडीओ खूप आवडतात, परंतु असे बरेच व्हिडीओ आहेत, जे पाहिल्यानंतर लोक त्यांच्यावर टीका करायला लागतात. तसेच, सर्वसामान्य जनतेशी संबंधित डान्सचे व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांची फारशी हरकत नसते, मात्र अनेकदा पोलिस-प्रशासनाशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या व्हिडीओवर लोक लगेच आक्षेप घेतात. आजकाल असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही महिला पोलिस कर्मचारी भोजपुरी गाण्यांवर डान्स करताना दिसत आहेत.


 



 


महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल


सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही मुली भोजपुरी गाण्यांवर डान्स करताना दिसत आहेत. या मुली उत्तर प्रदेशातील महिला पोलीस असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ उडाली आहे. 


लोकांकडून प्रश्न उपस्थित


व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मागे भोजपुरी गाणे वाजत आहे आणि आधी एक मुलगी नाचू लागते, मग नंतर दुसरी मुलगी त्याच खोलीत उपस्थित असलेल्या तिसर्‍या मुलीचा हात खेचते आणि मग ते दोघेही नाचू लागतात. या महिला पोलीस उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथील तार्यसुजन पोलीस ठाण्यातील असल्याचा दावा केला जात आहे. अवघ्या 30 सेकंदांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.


"रील व्हिडीओ बनवण्याच्या नादात पोलीस कर्तव्य विसरले"
महिला पोलिस कर्मचार्‍यांचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर एजाज अहमद नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'कुशीनगरमधील तार्यसुजन पोलिस स्टेशनमधील महिला कॉन्स्टेबलचा भोजपुरी गाण्यांवर नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल, सतत कारवाया करूनही पोलीस विभागात सुधारणा होत नाही. रील व्हिडीओ बनवण्याच्या नादात पोलीस आपले कर्तव्य विसरले असून त्यांच्याकडून सातत्याने चुका होत आहेत.


पोलीस गणवेशात व्हिडीओ व्हायरल
असाच एक व्हिडीओ दिल्लीतून समोर आला आहे. दिल्ली पोलीस अधिकाऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते 'मेरे बालम ठाणेदार'वर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओबाबत असे सांगितले जात आहे की, ते नारायण पोलिस स्टेशनचे एसएचओ आहे. कुटुंबातील रिंग सेरेमनीच्या कार्यक्रमात गणवेशात नाचताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.


महत्त्वाच्या बातम्या : 


Viral Video: पायलट आहे की शायर....या खास शैलीतील अनाऊन्समेंट ऐकून तुम्ही देखील व्हाल खूश; पाहा व्हिडीओ