Telangana Viral Video : पहाटेचे 5.30 वाजलेले... एक तरुणी आणि तिचे वडिल मंदिरातून घरी परतत होते. अचानक त्यांच्यासमोर एक पांढऱ्या रंगाची कार थांबली. आणि त्या कारमधून एक तरुण  खाली उतरतो. काहीही कळायच्या आत त्या तरुणीचा हात पकडून तो जबरदस्तीने गाडीच्या दिशेने आणतो. तेलंगणातील सिरसिल्ला जिल्ह्यातून एका 18 वर्षाच्या तरुणीच्या अपहरणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर संबंधित मुलीने अपहरणकर्त्याशी लग्न झाल्याचा मोठा खुलासा केला आहे


 


 






 


घटना सीसीटीव्हीत कैद
ही घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ज्यामध्ये कारमध्ये आलेले काही तरुण मुलीचे अपहरण करताना दिसत आहेत. अवघ्या 23 सेकंदात ही घटना घडली असून पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये हे तरुण आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान काही लोक गाडीतून खाली उतरतात. तेव्हा वडिलांसोबत जात असलेल्या एका मुलीला त्यातील एका तरुणाने पकडून कारमध्ये बसवल्याचे दिसून आले. 


तरुणीचे लग्न निश्चित झाल्याचे तरुणाला समजले
या टोळीने आपल्या मुलीला पळवून नेण्यापूर्वी मारहाण केल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यातील एक आरोपी मुलीच्या गावातील असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी 24 वर्षीय संशयित या तरुणीसोबत पळून गेला होता, मात्र पोलिसांनी त्याचे समुपदेशन केले आणि तरुणीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, आरोपीला समजले होते की, या तरुणीचे लग्न कोणा एका व्यक्तीसोबत निश्चित झाले आहे, त्यानंतर त्याने आपल्या मित्रांसह तिच्या अपहरणाचा कट रचला. यानंतर आरोपीला पकडण्यासाठी तसेच मुलीच्या सुटकेसाठी विशेष पथके तयार करण्यात आली. या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला.


अपहरणकर्त्याशी लग्न झाले असल्याचा मोठा खुलासा


संबंधित मुलीने यानंतर मोठा खुलासा केला आहे. तिने अपहरणकर्त्याशी लग्न केले असल्याचा दावा करणारा व्हिडिओ जारी केला. ती म्हणाली "आम्ही एक वर्षापूर्वी लग्न केले. तेव्हा मी अल्पवयीन असल्याने माझ्या पालकांनी ते मान्य केले नाही आणि माझ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आता आम्ही प्रौढ झालो आणि आमचे लग्न झाले. माझा नवरा दलित असल्याने ते अजूनही आक्षेप घेत आहेत"


मुलगी वडिलांसोबत मंदिरातून घरी परतत होती
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी एका मंदिरातून घरी परतत होती. मात्र, मुलीच्या वडिलांना काही समजण्यापूर्वीच हल्लेखोरांनी त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून पळ काढला. दरम्यान, मुलीच्या वडिलांनी वाहनाचा पाठलाग केला, मात्र कार भरधाव वेगाने जात असल्याने त्यांना काहीच करता आले नाही. सीसीटीव्हीत कैद झालेल्या पांढऱ्या रंगाच्या कारला नंबर प्लेटही नव्हती. 


पोलिसांनी गुन्हा दाखल केला
मुलीच्या अपहरणावर वेमुलवाडा डीएसपी नागेंद्र म्हणाले की, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही त्यांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. या घटनेत 4 जणांचा समावेश आहे. त्यांनी सांगितले की, आरोपींना पकडण्यासाठी सध्या 3 पथके तयार करण्यात आली आहेत.


महत्त्वाच्या बातम्या : 


Viral Video: पायलट आहे की शायर....या खास शैलीतील अनाऊन्समेंट ऐकून तुम्ही देखील व्हाल खूश; पाहा व्हिडीओ