Pilot Viral Video:  सोशल मीडिया (Social Media)  हा अनेक वेगवेगळ्या घटनांच्या व्हिडीओचा खजिना आहे. सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल (Viral Video)  होत असतात. काही व्हिडीओ आपल्याला हसवतात, तर काही रडवतात.  विमानातील अनेक मजेदार व्हिडीओ आपण सोशल मीडियावर बघितले आहेत. सध्या सोशल मीडियावर विमानातील एक मजेदार व्हिडीओ (Spicejet Pilot Viral Video)  सध्या व्हायरल होत आहे. विमानात प्रवास करण्यापूर्वी विमानातील क्रू मेंबर कायम प्रवाशांनी सुरक्षेसाठी किंवा आपात्कालीन परिस्थितीत काय करावे या विषयी सूचना देतात. सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये पायलटचा शायराना अंदाज दिसून येत आहे. पायलटचा हा शायराना अंदाज पाहून प्रवासी आनंदी झाले.


विमानातून प्रवास करताना विमानातील घोषणा सहसा इंग्रजी आणि हिंदी भाषेत केल्या जातात. पण या विमानाच्या पायलटने हिंदी भाषेत मजेशीर पद्धतीने सूचना देण्यास सुरुवात केल्याने स्पाईसजेटच्या (Spicjet) विमानातील प्रवाशांना धक्काच बसला. दिल्लीहून श्रीनगरला (Delhi to Srinagar)  जाणाऱ्या विमानात पायलटने  शायरीमध्ये अनाऊंसमेंट  केली. पायलटचा हा अंदाज पाहून प्रवासी भलतेच आनंदी झाले. एका प्रवाशाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. पायलटचा हा अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच आवडला. पायलटचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी भलतेच खूश झाले






सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ Eepsita नावाच्या यूजरने ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करणारी प्रवाशी स्पाईसजेटच्या श्रीनगर ते दिल्ली या विमानात प्रवास करत होती. पायलटने शायरीमध्ये अनाऊन्समेट केली त्यावेळी  हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.


सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केल्यानंतर काही वेळातच हा व्हिडीओ व्हायरल झाला. ट्विटरवर आतापर्यंत या व्हिडीओला 27 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले असून पाच हजारपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. पायलटचा हा शायराना अंदाज पाहिल्यानंतर अनेकांना पायलटचे कौतुक केले आहे. एका यूजरने केलेल्या कमेंटमध्ये लिहिले की, पायलटचा अंदाज चांगला असून मला हा पायलट इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये प्रवास करताना पाहिजे