Viral Video : डिसेंबर (December) महिना येताच थंडीचा जोर (Winter) वाढू लागतो. अनेक ठिकाणी एवढी थंडी आहे की लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. लोकांना इच्छा असूनही घराबाहेर पडता येत नाही. उत्तर भारतात अजूनही परिस्थिती ठीक आहे, पण हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये खूप थंडी आहे, येथील बर्फवृष्टी म्हणजे, सर्व काही गोठते. नद्याही गोठतात. सध्या अमेरिकेतही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. भीषण बर्फाच्या वादळाने अमेरिकेतील अनेक भाग बर्फाखाली गेले आहेत. आजकाल याच्याशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.


 


 






व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल



या व्हिडिओमध्ये एक रेस्टॉरंट पूर्णपणे बर्फाने झाकलेले दिसत आहे. इथे इतका बर्फ आहे की सर्व काही गोठले आहे. बाहेर बर्फाचे जाड थर जमा झाले आहेत. हे शहर नदीच्या काठावर असल्याने येथील परिस्थिती वाईटापेक्षा वाईट झाली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की रेस्टॉरंट जणू एका 'बर्फाच्या महालासारखे' बनले आहे. आजूबाजूला फक्त बर्फच बर्फ दिसतोय. परिसरात शांतता आहे. जणू काही वर्षानुवर्षे कोणीही गेलेलं नाही. या रेस्टॉरंटचे नाव Hoaks रेस्टॉरंट असे सांगितले जात आहे, जे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील हॅम्बर्ग येथे आहे.


 


 


 


भयानक थंडीचा कहर...


हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @CBNEWSHOTOG नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'हॅम्बर्गमधील होक्स रेस्टॉरंटचे हे दृश्य खरे आहे. हे बर्फाच्या महालाप्रमाणे दिसते!'. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जण 'हे वास्तव असू शकत नाही' असे म्हणत आहेत, तर काहीजण हे दृश्य अतिशय भीतीदायक असल्याचे सांगत आहेत.


 


आजवरचे सर्वात मोठे हिमवादळ
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अमेरिकेतील हे हिमवादळ आजवरचे सर्वात मोठे हिमवादळ मानले जाते, ज्यामुळे आतापर्यंत 25 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.


 


महत्त्वाच्या बातम्या : 


Viral Video: नवरदेव गळ्यात हार घालणार तितक्यात नवरीनं केलं असं काही; व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले