Viral Video: सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. लग्नसोहळ्यातील देखील बरेच व्हिडीओ व्हायरल होतात. या व्हिडीओमधील काही व्हिडीओ भावनिक तर काही मजेशीर असतात. व्हिडीओग्राफर (Videographer) आणि फोटोग्राफर (Photographer) हे विवाह सोहळ्यातील खास क्षण त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये टिपत असतात. असाच एका लग्नसोहळ्यातील मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव आणि नववधु हे एकमेकांच्या गाण्यात फुलांचा हार घालताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये नवरी ही नवरदेव हार घलताना मागच्या बाजूला झुकलेली दिसत आहे. हे पाहून अनेक नेटकरी चक्रावले.


प्राची तोमरनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नववधू ही नवदेव  हार घालणार तितक्यातच मागच्या बाजूला झुकते. 'जेव्हा नवरी योगाला सिरियसली घेते'असं या व्हायरल व्हिडीओवर लिहिलेलं दिसत आहे. हा व्हिडीओ 10 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. आतापर्यंत हा व्हिडीओ 1.7 मिलियन नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. 


पाहा व्हिडीओ: 



नेटकऱ्यांच्या कमेंट्स
'180 डिग्री लिनियर बेंड' अशी कमेंट एका नेटकऱ्यानं या व्हिडीओला केली आहे. तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'याची प्रॅक्टिस ती आयुष्यभर करत असणार.' 'मी हे कधीच विसरु शकत नाही', अशी कमेंट देखील एका नेटकऱ्यानं केली. 


व्हिडीओमध्ये नवरी ही  रेड आणि ऑलिव्ह ग्रीन कलरचा लेहेंगा, ज्वेलरी अशा रॉयल लूकमध्ये दिसत आहे. तर नवरदेव हा ऑल व्हाईट लूकमध्ये दिसत आहे.  


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Viral Video : नवऱ्याला सोडून लग्नात नववधू दीरासोबत बेफाम नाचली, एका कोपऱ्यात बसलेल्या बिचाऱ्या नवऱ्याचा व्हिडीओ व्हायरल